शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

औषधीद्रव्ये कायद्याचा औषध निर्यातीशी संबंध नाही

By admin | Updated: October 20, 2016 03:12 IST

औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा औषध निर्यातीशी काहीही संबंध नाही हा औषध निर्यातदार कंपन्यांचा दावा

कंपन्यांचा दावा मंजूर : हायकोर्टातील प्रकरण निकालीनागपूर : औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा औषध निर्यातीशी काहीही संबंध नाही हा औषध निर्यातदार कंपन्यांचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात योग्य ठरला आहे. यामुळे संबंधित कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.निर्यातीची औषधे राज्य शासनाने औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत जप्त केली होती. या कारवाईविरुद्ध काळे इम्प्लेक्स, एन. एन. एजन्सीज, बालाजी सेल्स व ए. डी. फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंपन्यांचा दावा योग्य ठरल्यानंतर ही याचिका निकाली काढण्यात आली. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.याचिका प्रलंबित असताना उपमहासंचालक (आंतरराष्ट्रीय संबंध व जागतिक व्यवसाय) यांनी ५ जून २०१४ रोजी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांना पत्र पाठविले. त्यात राज्य शासनाला आंतरराष्ट्रीय वस्तू जप्त करण्याचा अधिकार नसून ही बाब सीमाशुल्क विभागातील सहायक औषधीद्रव्ये नियंत्रकाच्या अख्त्यारित येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही औषधीद्रव्ये व सौंदर्यप्रसाधने कायद्याचा निर्यातीशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शासनानेही ही बाब मान्य केली. राज्य शासनाला केवळ परवान्यासंदर्भातील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे, अ‍ॅड. एम. एम. अग्निहोत्री व अ‍ॅड. ए. के. सोमानी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)