शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षाच्या स्वप्नांना लाभले पंख

By admin | Updated: June 24, 2017 02:26 IST

अपेक्षा कोटूरवार. मोठे स्वप्न पाहणारी एक धडपडी मुलगी. घरच्या अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात करीत कशीतरी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपेक्षा कोटूरवार. मोठे स्वप्न पाहणारी एक धडपडी मुलगी. घरच्या अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात करीत कशीतरी पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षापर्यंत पोहोचली. परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसेच नव्हते. एके दिवशी ती लोकमत भवनात आली. आपली कैफियत मांडली. लोकमतनेही आपली सामाजिक बांधिलकी जपत तिच्या शिक्षणासाठी मदतीच्या आवाहनाचे वृत्त प्रकाशित केले. अपेक्षाला मदत मिळाली. तिनेही या मदतीचे सोने करीत बी. ई. सिव्हीलच्या अंतिम वर्षापर्यंतचा प्रवास अगदी प्रथम श्रेणीत पूर्ण केला आहे. शुक्रवारी ती आपल्या आईसोबत अनपेक्षितपणे लोकमत कार्यालयात आली अन् तिच्या स्वप्नांना पंख दिल्याबद्दल तिने लोकमतबाबत कृतज्ञता व्यक्त केली. अपेक्षा प्रतापनगरात राहते. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तिची आई जया कोटूरवार इतरांकडे स्वंयपाक करून कसेतरी घर चालवते. २०१५ साली पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाला असताना ती लांडेसर यांच्या मार्गदर्शनानुसार लोकमत कार्यालयात आली. तिची कैफियत ऐकल्यानंतर लोकमतने अपेक्षाच्या मदतीसाठी वृत्त प्रकाशित केले. ते वाचून बेरार फायनान्सचे संचालक संजय जवंजाळ पुढे आले. त्यांनी शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याची हमी दिली व ती पूर्णही केली. अपेक्षाने हिंगण्यातील रायसोनी अकॅडमी येथून शिक्षण सुरू केले. संदीप चौधरी, भोतकर सर यांनी अपेक्षाच्या शिकवणी वर्गासाठी आर्थिक मदत केली. या सर्व सहृदयी माणसांच्या बळावर अपेक्षाने बी. ई. सिव्हिलच्या अंतिम वर्षापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. शुक्रवारी लोकमत कार्यालयात आल्यावर तिने संपादकीय मंडळींशी आपल्या यशाचा प्रवास ‘शेअर’ केला आणि हे केवळ लोकमतमुळे घडल्याचे सांगत कृतज्ञताही व्यक्त केली. आता एम. टेक.चे आव्हान अंतिम वर्षाच्या शिक्षणाची जबाबदारी संजय जवंजाळ यांनी स्वीकारली आहे. पण, अपेक्षाला खूप शिकून, नोकरी मिळवून आपल्या आईला आधार द्यायचा आहे. शिक्षणासाठी कितीही कठोर परिश्रम घ्यायला ती तयार आहे. पुढे एम. टेक. करायचे आहे. परंतु पुन्हा गरिबी तिच्या यशाच्या मार्गाआड आव्हानाच्या रूपात उभी झाली आहे. एम. टेक.च्या शिक्षणासाठी पैसेच नसल्याने आपले स्वप्न अर्ध्यावर मोडते की काय अशी भीती तिला सतावत आहे. तिची ही भीती दूर करून तिच्या पुढच्या शिक्षणासाठी समाजातील सहृदयी माणसांचे मदतीचे हात यावेळीही पुढे येतील अशी अपेक्षा आहे.