शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या घराचे स्वप्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून देशभरात पंतप्रधान घरकुल याेजना राबविली जाते. ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून देशभरात पंतप्रधान घरकुल याेजना राबविली जाते. या याेजनेच्या लाभार्थ्यांची निवड करताना रामटेक तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चुका तर त्यानंतर तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीत घाेळ करण्यात आल्याने या याेजनेच्या मूळ हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चुका व घाेळ दुरुस्त न केल्यास गरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न अधांतरी राहण्याची शक्यता बळावली आहे.

रामटेक तालुक्यात सन २०१६ ते २०१९ या काळात पंतप्रधान घरकुल याेजनेंतर्गत १,३९४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, ३६ घरांचे बांधकाम अपूर्ण आहे. या काळात १,४३१ घरकुलांच्या बांधकामाचे लक्ष्य ठरविण्यात आले हाेते आणि एवढ्याच घरकुलांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली हाेती. सन २०१९ ते २०२१ या काळात १,७७८ घरकुल बांधकामाचे लक्ष्य हाेते. यातील १,६३६ घरकुलांना मंजुरी दिली हाेती. यातील ६१२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, १,०२४ घरकुलांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. याला करारनामा न करणे, अतिक्रमण, खाते पडताळणी यासह अन्य कारणे जबाबदार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्यात शबरी आवास याेजनेची अवस्था फारच बिकट आहे. या याेजनेंतर्गत सन २०१६ ते २०१९ या काळात ४२३ घरकुल बांधकामाचे लक्ष्य ठरविण्यात आले हाेते. यातील ४२१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली हाेती. यातील ४०६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, १५ घरकुले अपूर्ण आहेत. सन २०१९ ते २०२० या काळात १३६ घरकुलांचे लक्ष्य ठरवून त्याला मंजुरी देण्यात आली असली तरी, यातील ६७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ७३ घरकुले अजूनही अपूर्णच आहेत.

रमाई आवास याेजनेंतर्गत अपूर्ण असलेल्या घरकुलांचे प्रमाण अधिक आहे. या याेजनेंतर्गत सन २०१६ ते २०१९ या काळात ३६२ घरकुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली हाेती. यातील ५८ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. सन २०१९ ते २०२० या काळात १२७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, यातील १२५ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण असून, केवळ दाेन घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रमाई आवास याेजना विविध समस्यांनी ग्रासली असून, अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. हा प्रकार जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी उघडकीस आणला असून, त्यांनी यासंदर्भात खा. कृपाल तुमाने यांना निवेदनही दिले आहे. याच यादीच्या आधारे घरकुलांना मंजुरी दिली तर १० वर्षांपर्यंत गरिबांना घरकुल मिळणार नसल्याचेही संजय झाडे यांनी सांगितले.

...

लॅन्डलाईन टेलिफाेन कारणीभूत

ग्रामीण भागातून लॅन्डलाईन टेलिफाेन हद्दपार झाला आहे. टेलिकाॅम सेक्टरमध्ये खासगी कंपन्या आल्यानंतर ग्रामीण भागातील काही नागरिकांनी खासगी कंपन्यांचे लॅन्डलाईन फाेन घेतले हाेते. परंतु, माेबाईलमुळे अवघ्या दाेन-तीन वर्षात ते हद्दपार झाले. लाभार्थ्यांकडे लॅन्डलाईन फाेन असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आल्याने अनेकांचे अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. वास्तवात सध्या ग्रामीण भागात कुण्याही लाभार्थ्याच्या घरी लॅन्डलाईन फाेन दिसून येत नाही.

...

दाेन खाेल्या ठरल्या अडसर

अर्ज बाद हाेण्यास लाभार्थ्यांकडे असलेल्या दाेन खाेल्याही अडसर ठरल्या आहेत. लाभार्थ्यांकडे असलेले वडिलाेपार्जित मातीचे घर माेडकळीस आल्याने काहींनी ते पाडले आणि त्या जागेवर छाेट्या दाेन खाेल्यांचे बांधकाम करून त्यात राहायला सुरुवात केली. परंतु, त्यांच्याकडे दाेन खाेल्या आहेत म्हणून त्यांना या याेजनेचा लाभ नाकारण्यात आला. याच कारणावरून साेनेघाट (ता. रामटेक) येथे केवळ तीन अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, तब्बल ६०० अर्ज बाद ठरविले आहेत. ही स्थिती प्रत्येक गावात दिसून येते.

...

लाभार्थ्यांच्या यादीत काही घाेळ असू शकताे. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेऊन त्यावर याेग्य निर्णय घेता येईल. ऑनलाईनमध्ये डेटा भरताना चुका हाेऊ शकतात. घरकुलासाठी ग्रामीण भागात १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शहरी भागात हे अनुदान अधिक आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरातून बांधकाम साहित्य खरेदी करतात. मजुरीही सारखीच आहे. रेतीची समस्याही आहे. काही ठिकाणी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे त्यांना या याेजनेचा लाभ देताना अडचणी येत आहेत. वनविभागाने अशा गरजूंना नाहरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.

- प्रदीप ब्रम्हनाेटे,

खंडविकास अधिकारी, रामटेक.