शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

अंधारलेल्या डोळयांनी पाहिले प्रकाशाचे स्वप्न

By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST

वय वर्षे पाच. फुलपाखरासारखे बेधुंद बागडण्याचे हे दिवस़ नकळता देवी नावाचा आजार झाला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या आजाराने अनिकेतचे डोळे हिरावून गेलेच. या घटनेने आई खचली, मात्र तिने धीर सोडला नाही.

अपंगांमध्ये अनिकेत विदर्भातून पहिला मंगेश व्यवहारे - नागपूरवय वर्षे पाच. फुलपाखरासारखे बेधुंद बागडण्याचे हे दिवस़ नकळता देवी नावाचा आजार झाला. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही या आजाराने अनिकेतचे डोळे हिरावून गेलेच. या घटनेने आई खचली, मात्र तिने धीर सोडला नाही. नियतीला हेच मान्य असेल, या भावनेतून ती हिंमतीने उठली, मुलाच्या पंखाला बळ देण्यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. डोळयात अंधार असतानाही अनिकेतने प्रकाशाचे स्वप्न पाहिले आणि जिद्दीने, मेहनतीने ते वास्तवातही उतरविले़ आज अनिकेत दहावीच्या परीक्षेत ८९.२० टक्के गुण घेत, अपंगामध्ये विदर्भातून पहिला आला आहे़जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर अनिकेत दिनकर बेंडे या विद्यार्थ्याने हे घवघवीत यश मिळवून दृष्टिहीनापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अनिकेतने कधीही पहिला नंबर सोडला नाही. त्याने १ ते ७ पर्यंत त्याचे शिक्षण अंध शाळेत झाले. आणि आठव्या वर्गानंतर त्याने साधारण विद्यार्थ्यांच्या वर्गात शिक्षण घेतले. डोळसांबरोबर शिकत असला तरी, डोळसांच्या तुलनेत त्याची गुणवत्ता कुठेच कमी नव्हती़ निव्वळ अभ्यासातच नाही, तर संगीतातही त्याची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. तो उत्कृष्ट सिंथेसायझर वाजवितो. गायनाच्या तर त्याने पाच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या आहे. त्याचे गायनाचे बरेच स्टेज प्रोग्राम झाले आहे. क्रिकेटचा अत्यंत चाहता असणाऱ्या अनिकेतने परीक्षेच्या काळातही आयपीएल वर्ल्डकपच्या मॅचेसचा आनंद घेतला. अनिकेतचा नम्र स्वभाव, अभ्यासू वृत्ती, जिद्द त्याच्यातील या गुणांमुळे तो सर्वांचा आवडता आहे. अनिकेतला आईबरोबरच त्याच्या शाळेतील शिक्षिकेचे विशेष सहकार्य लाभले. त्याची आई डोळस पुस्तकातून वाचायची. ते अनिकेत ब्रेलमध्ये लिहून घ्यायचा. दिवसभर तो शाळा, गायन, संगीत यात रमायचा. आणि रात्री ११.३० ते ३.५० दरम्यान अभ्यास करायचा. अभ्यासात कधीच खंड पाडला नाही. शाळेत अंध विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विद्या बचाले या विशेष शिक्षिकेने अनिकेतला विशेष सहकार्य केले. त्याला आलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याची लेखनिक असलेली उन्नती मामुलकर हिचाही अनिकेतच्या यशात मोलाचा वाटा आहे.