शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सुषमानेच केली पती व मुलांची हत्या; चार महिन्यानंतर खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 10:47 IST

Nagpur News crime कोराडीतील ओमनगर येथे चार महिन्यापूर्वी राणे दाम्पत्य व दोन मुलांचा रहस्य मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

ठळक मुद्देखुनाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोराडीतील ओमनगर येथे चार महिन्यापूर्वी राणे दाम्पत्य व दोन मुलांचा रहस्य मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पत्नी डॉ. सुषमा राणे यांनीच पती व मुलांना विष देऊन हत्या केली व नंतर आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. सुषमा हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वाद, पतीचा शंकेखोर स्वभाव आणि दारूचे व्यसन यामुळे सुषमाने हे टोकाचे पाऊल उचलले होते, अशी माहिती झोन - ५ चे डीसीपी नीलोत्पल यांनी बुधवारी दिली.

गेल्या १८ ऑगस्ट रोजी दुपारी खासगी महाविद्यालयातील प्राध्यापक धीरज राणे, त्यांची पत्नी डॉ. सुषमा, मुलगा ध्रुव व मुलगी  हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले होते. तेव्हा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. धीरज आणि मुले बिछान्यावर मृत पडली होती तर सुषमाने गळफास घेतला होता. पोलिसांना घटनास्थळावरून ऍनेस्थेशिया देण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आणि सिरिंज सापडले हाेते. धीरज आणि मुलांच्या उजव्या हातावर इंजेक्शन दिल्याचे निशाणसुद्धा आढळून आले होते. त्यामुळे तिघांनाही इंजेक्शन दिल्यानंतर सुषमा यांनी स्वत: आत्महत्या केल्याचे दिसून येत होते.

सुषमा ही धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर होती. घटनेच्या दिवशी ती मुलीसोबत नेस्थेशियासाठी वापरण्यात येणारे औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. नर्सला कुत्री रात्रभर भुंकत असल्याचे सांगून त्यांना झोपविण्यासाठी औषध आणि सिरिंज मागितली होती. सुषमाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु धीरज व मुलांच्या रिपोर्टलाा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. ७ डिसेंबर रोजी रासायनिक विश्लेषणाच्या रिपोर्टवरून धीरज व मुलांचा मृत्यू विष दिल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर कोराडी पोलिसांनी बुधवारी सुषमाविरुद्ध पती व दोन मुलांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला.

मुलगा होता ज्युडो कराटे चॅम्पियन

सुषमा ही आपल्या वैवाहिक जीवनात इतकी हताश झाली होती की, आपला गुणवंत मुलगा ध्रुव याचा जीव घेतानाही तिने मागेपुढे पाहिले नाही. ध्रुव हा ज्युडो कराटे चॅम्पियन होता. तो काही दिवसापूर्वीच लंडन येथून एक स्पर्धा जिंकून आला होता. त्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल हाेते. तो अभ्यासातही अतिशय हुशार होता. हे प्रकरण उघडकीस आणण्यात डीसीपी नीलोत्पल यांची महत्त्वाची भूमिका राहिली. पोलिसांना सुषमाच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक पुरावे व चौकशी अहवाल गोळा करावे लागले.

टॅग्स :Murderखून