शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

डॉ. मोहन काशीकर यांना विभागप्रमुख पदावरून हटवण्यावर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 00:12 IST

High court relief डॉ. मोहन काशीकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख पदावरून हटवण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा दिलासा : कुलगुरूंच्या कारवाईला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : डॉ. मोहन काशीकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख पदावरून हटवण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे काशीकर यांना दिलासा मिळाला.

या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी काशीकर यांच्याकडे मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपवला होता. काशीकर यांनी कौटुंबिक कारणांमुळे ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कुलगुरूंनी ५ मे २०२१ रोजी वादग्रस्त आदेश जारी करून काशीकर यांना विभागप्रमुख पदावरून हटवले व त्यांची एक वेतनवाढ रोखली. त्याविरुद्ध काशीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण विभागाचे प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली त्यावेळी हे पदच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे या पदाची जबाबदारी नाकारल्यामुळे कर्तव्यात कसूर करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता त्यांना अंतरिम दिलासा दिला. तसेच, वादग्रस्त आदेशावर पुनर्विचार व्हावा यासाठी तीन दिवसात सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्यास सांगितले आणि सक्षम प्राधिकाऱ्याने अर्ज मिळाल्यानंतर त्यावर तीन आठवड्यात कायद्यानुसार निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. काशीकर यांच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ