शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

डॉ. किशोर टावरी यांचे निधन

By admin | Updated: September 1, 2016 02:59 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एमसीआय) सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष व नागपूर

वैद्यकीय क्षेत्रात शोककळानागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे (एमसीआय) सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष व नागपूर मेडिकल कॉलेजच्या रेडिओलॉजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर बद्रिदास टावरी (५९) यांचे बुधवारी दुपारी २.३० वाजता दीर्घ आजाराने निवासस्थानी निधन झाले. डॉ. टावरी गेल्या डिसेंबरपासून मोटोन्युरॉन डिसीज या गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रस्त होते. उत्कृष्ट शिक्षक, चिकित्सक व ज्ञानाचा सागर असा त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.धामणगावच्या बाजूला असलेल्या घुईखेड येथे २७ सप्टेंबर १९५७ रोजी डॉ. टावरी यांचा जन्म झाला. मेडिकलच्या १९७४ च्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. याच महाविद्यालयातून रेडिओलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक संस्थांचे पद भूषविले. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. २००५-०६ मध्ये नागपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष होते. २०१० मध्ये इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याच वर्षी ते सार्क रेडिओलॉजिकल असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य होते. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले अनेक शोधनिबंध सादर केले होते. ते उत्स्फूर्त वक्ते होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. नागपूर मेडिकल कॉलेजमधील रेडिओलॉजी विभागाच्या विकासासाठी त्यांचे प्रयत्न मोठे होते. त्यांच्या पुढाकारामुळेच १७ एप्रिल २०१६ रोजी नागपुरात ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’चा पहिला पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा डॉक्टरांना देण्यात आला. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा दिली. इस्पितळांमधील आरोग्य सेवेचे दर सुनिश्चित करणाऱ्या ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’मध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. ‘कट प्रॅक्टिस’च्या विरोधात डॉ. टावरी यांनी विशेष काम केले. ते नेहमी आपल्या भाषणातून डॉक्टरांना अनैतिक प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन करीत. मुंबई येथे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नवीन इमारत उभी करण्यास त्यांचा मोठा वाटा होता. उत्तम शिक्षक व अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या मागे पत्नी डॉ. भारती, मुले डॉ. अभिजित व इंजि. अभिषेक व मोठा आप्तपरिवार आहे. अंत्ययात्रा उद्या गुरुवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या रामदासपेठ येथील राहत्या निवासस्थानावरून मोक्षधाम घाटावर जाईल.काय आहे मोटोन्युरॉननागपूर : डॉ. किशोर टावरी यांचे निधन मोटो न्युरॉन  डिसीज (एमएनडी) या आजाराने झाले. हा आजार मांसपेशीतील हालचालींना नियंत्रित करणाऱ्या पेशींना नष्ट करतो. यामध्ये बोलणे, चालणे, श्वास घेणे व गिळण्याची प्रक्रिया अंतर्भूत आहे. साधारणत: या आजारात मेंदूतील मज्जापेशी ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्डपर्यंत जातात. त्यातून त्या मांसपेशीपर्यंत पोहोचतात. या प्रक्रियेत अडथळे आल्यानंतर मांसपेशी योग्यरीत्या कार्य करीत नाहीत. त्या हळूहळू कमजोर होतात. नंतर काही कालावधीनंतर त्यांची प्रक्रियाच बंद होते.