शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगीकरण डिसेंबरअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 22:11 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित मिहान प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देआरएसपी फॉर्मेटला मिळणार मंजुरीविमानतळ विकासासाठी टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या अंतिम शर्यतीत

आॅनलाईन लोकमतनागपूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित मिहान प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. विमानतळ विकासासाठी टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या अंतिम शर्यतीत आहेत.आरएसपी फॉर्मेट राज्य शासनाकडेविमानतळाचे संचालन करणाऱ्या  मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) कंपनीने तयार केलेला ‘आरएसपी’ फॉर्मेट राज्य शासनाकडे पाठविला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाने त्यावर तातडीने निर्णय घेतल्यास या पाच कंपन्यांकडून ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (आरएसपी) अर्थात जी कंपनी अधिकाधिक महसूल मिळवून देण्याचे हमीपत्र देईल, त्या कंपनीला विमानतळ विकास संचालनाची जबाबदारी दिली जाणार आहे.मिहान प्रकल्पात विमानतळ विकासाचा समावेश आहे. नागपूर विमानतळाचे हस्तांतरण राज्य सरकारकडे करून पाच वर्षांत खासगीकरणाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार होता. ७ आॅगस्ट २००९ रोजी विमानतळाचे राज्य सरकारला हस्तांतरण करण्यात आले. त्यानतर पाच वर्षे अर्थात ७ आॅगस्ट २०१४ पर्यंत विकासाची साधी निविदाही निघाली नाही. त्यानंतर २०१६ मध्ये निविदा निघाली. त्यावेळी १२ कंपन्या शर्यतीत होत्या. त्यातील पाच कंपन्या पात्र ठरल्या.नवीन विमानतळ उभे राहणारकंत्राट मिळालेल्या कंपनीला १९८२ कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ उभे करायचे आहे. पहिल्या टप्प्यात १४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत दोन समांतर धावपट्ट्या, कार्गो आणि टर्मिनल इमारत तसेच विविध एमआरओंचा समावेश राहणार आहे. पुढील तीन टप्पे ५४० कोटी रुपयांचे असतील.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन राज्य सरकार (एमएडीसी) करीत आहे. त्यात राज्य सरकारची ५१ टक्के आणि केंद्र सरकारची (भारतीय विमानतळ प्राधिकरण) ४९ टक्के भागीदारी आहे. विमानतळाच्या खासगीकरणानंतर कंत्राटदार कंपनीकडे ७४ टक्के समभाग राहतील आणि राज्य व केंद्राची भागीदारी १३-१३ टक्के राहील. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाचीदेखील मंजुरी आवश्यक आहे. विमानतळाच्या खासगीकरणासाठी काढण्यात येणाऱ्या  निविदेला कंपन्यांच्या विनंतीनुसार दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे.नागपूर जागतिक स्तरावरखासगीकरणामुळे नागपूर विमानतळाचे नाव जागतिक उड्डयण क्षेत्राच्या नकाशावर येणार आहे. गेल्या दोन वर्षांत प्रवाशांची संख्या १८ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. औषधी, फळे आणि भाज्यांच्या निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेज सुरू करण्यात आले आहे. पुढे क्षमता वाढविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Airportविमानतळ