शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

डॉ. बबनराव तायवाडे यांचा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 07:00 IST

Nagpur News मी राज्य मागासवर्ग आयोगाचाा सदस्य असूनही जर ओबीसींना न्याय देऊ शकत नसेल तर मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपण आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. बबनराव तायवाडे यांनी बुधवारी जाहीर केले.

ठळक मुद्देकेंद्राने घटना दुरुस्ती केल्याशिवाय ओबीसी आरक्षण अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने सर्व प्रक्रिया केली तरी ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहणार नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहे. मी राज्य मागासवर्ग आयोगाचाा सदस्य असूनही जर ओबीसींना न्याय देऊ शकत नसेल तर मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपण आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. बबनराव तायवाडे यांनी बुधवारी जाहीर केले. (Dr. Babanrao Taywade resigns from State Backward Classes Commission)

तायवाडे म्हणाले, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून आपण आपला निर्णय त्यांना कळविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहे. ओबीसींना हा मोठा धक्का आहे. राज्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कायम रहावे यासाठी राज्य सरकारने हालचाली करत राज्य मागासवर्ग आयोग नेमला.

 

आयोगाने इम्पिरिकल टाडा गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रिया केली तरी २७ टक्के आरक्षण कायम राहणार नाही, हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संविधानाच्या कलम २४३ डी व टी नुसार पंचायत समिती तसेच महानगरपालिकांना आरक्षण दिले आहे. त्यातील पोटकलम ६ मध्ये सुधारणा करून ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. सोबतच केंद्राने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी व ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही डॉ. तायवाडे यांनी केली.ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापणार- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. सोबतच एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू आहे. अशात आता डॉ. तायवाडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत. तायवाडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता आरक्षणाच्या मुद्द्यावर महासंघासह विविध ओबीसी संघटनाही आक्रमक भूमिका घेणार आहेत.

असा आहे आयोग- राज्य मागासवर्ग आयोगात अध्यक्षांसह एकूण ११ सदस्य आहेत. आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश ए.व्ही. निरगुडे तर सदस्य सचिव दत्ता देशमुख आहेत. याशिवाय ९ सदस्य आहेत. आजवर आयोगाच्या पाच बैठका झाल्या आहेत.

टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडे