शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीचा डबल धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाईचा डबल धमाका केला. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - एसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाईचा डबल धमाका केला. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या तर, दुसरीकडे वाहतूक शाखेच्या पोलिसाला लाच मागण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले. एकाच दिवशी दोघांच्या विकेट घेतल्याने लाचखोरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महापालिकेत सफाई कर्मचारी असलेले पीडित ३१ मार्चला निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांची पत्नी पतीचे निवृत्ती वेतन आणि इतर हक्काचे लाभ मिळावे म्हणून धरमपेठ झोनचे आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (वय ५५) यांच्याकडे चकरा मारू लागली. निवृत्ती वेतनासोबतच शिल्लक सुट्यांचे पैसे वाढवून देण्याची बतावणी करून गजभियेने या महिलेला ३ जून रोजी १० हजाराची मागणी केली. महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरुणाला खिळले आहे. तर, सदर महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. १० हजाराची रक्कम खूप जास्त असल्याने महिला एसीबीत पोहचली. तिच्या तक्रारीवरून एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी उपअधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात नायक रविकांत डहाट, अनमोल मनघरे, आँचल हरगुळे, अस्मिता मेश्राम आणि प्रिया नेवरे यांनी दुपारी ४ वाजता गजभियेला लाचेचे १० हजार रुपये स्वीकारताच रंगेहाथ पकडले.

---

‘ऑन डिमांड विकेट’

दुसरी कारवाई प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तक्रारदाराच्या ऑटोला १० मे रोजी शंकरनगर चाैकाजवळ एका ॲम्ब्युलन्सची धडक बसली होती. त्यावेळी पोलीस शिपाई बिपीन शंकरराव महाजन (वय ३२) याने ऑटोचालकाला ५०० रुपयाची लाच दे अन्यथा तुझा ऑटो चेंबरला लावून २ हजाराच्या दंडाची कारवाई करेन, अशी धमकी दिली होती. तो लाचेसाठी कारवाईची सारखी धमकी देत असल्याने आठ दिवसापूर्वी ऑटोचालकाने त्याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदविली. एसीबीने कारवाईचा सापळा लावला. मात्र, संशय आल्यामुळे महाजन लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी आरोपी महाजनविरुद्ध लाच मागण्याची (ऑन डिमांड) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी दुपारी उपअधीक्षक नरेश पार्वे यांच्या नेतृत्वात लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सचिन किन्हेकर आणि शारिक शेख यांनी लाचखोर महाजनला जेरबंद केले.

----