शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित मोमिनपुऱ्यातील कुणालाही बाहेर पडू देऊ नका : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:26 IST

कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असलेल्या मोमिनपुरा येथील बकरा व्यापारी व अन्य व्यक्तींना शहराच्या इतर भागात जाऊ देऊ नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना दिला.

ठळक मुद्देबकरामंडी वाठोड्यात स्थानांतरणाला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असलेल्या मोमिनपुरा येथील बकरा व्यापारी व अन्य व्यक्तींना शहराच्या इतर भागात जाऊ देऊ नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना दिला.मोमिनपुरा येथे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी १२ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशाद्वारे मोमिनपुºयाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. परिणामी, या क्षेत्रातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत व बाहेरचे नागरिक या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत. असे असताना महानगरपालिका उपायुक्तांनी ४ मे २०२० रोजी वादग्रस्त आदेश जारी करून मोमिनपुरा येथील बकरामंडी वाठोडा येथे स्थानांतरित केली आहे. ही जागा सरकारी क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजच्या जवळ आहे. परिणामी, या वादग्रस्त आदेशाविरुद्ध वाठोडा येथील उमेश उतखेडे, कृष्णा मस्के व दिनेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.या प्रकरणावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वरील अंतरिम आदेश दिला. तसेच, राज्य सरकार, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्यास सांगितले. नियमानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींना त्या क्षेत्राच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे मनपा उपायुक्तांचा आदेश मनपा आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. मोमिनपुऱ्यातील बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. कार्तिक शुकुल तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या