शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रेडा बोलला की माहित नाही, मात्र तुम्ही-आम्ही बोलते झालो : प्रमोद जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:28 IST

ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे.

ठळक मुद्देश्री दत्तजयंत्युत्सव सोहळा प्रवचन माला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्ञानदेवाने रेड्याला बोलते केले की नाही, हा वादाचा विषय असू शकतो आणि रेडा बोलला यावर विश्वासही बसेल. मात्र, त्याच ज्ञानदेवाने तुमच्या-आमच्यासारख्या हजारो रेड्यांना बोलविते केले, हा खरा चमत्कार आहे. ज्ञानदेवांसारख्या महापुरुषाने डोक्यावर हात ठेवून शक्तीपात केल्यानंतर तो रेडा न बोलता, तेच नवल. या चमत्कारानंतर तो रेडा आळंदीपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे चालत आला, हेदेखील समजून घ्यावे लागेल. सात शतकांपूर्वी संतांच्या मार्गदर्शनात चालावे, हे त्या रेड्याला कळले पण, आपल्याला आजही ते उमगले नाही, अशा शब्दांत बारामतीचे हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप यांनी ‘संतांचा सुखाचा मार्ग’ या विषयावर पुष्प गुंफले.श्री विष्णुदासजी महाराज अध्यात्म साधना केंद्र, नागपूरच्या वतीने आयोजित श्री दत्तजयंत्युत्सव सोहळ्यातील प्रवचन मालेत, दादामहाराज सातारकर यांचा पुण्यस्मरणदिन आणि गीताजयंतीचे औचित्य साधून त्यांनी प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.संसारामध्ये कधीही सुखाचा शोध घेऊ नका. ते कदापिही सापडणार नाही. ज्याप्रमाणे नागपूरची गाडी पुण्याला पोहचणार नाही त्याप्रमाणे संसाराच्या गाडीत सुखाचे स्टेशन कधीच येणार नाही. त्यासाठी, गाडी बदलावी लागेल आणि अध्यात्माच्या गाडीत बसावे लागेल तरच सुखाचे स्टेशन मिळू शकेल, असे सूचक विवेचन जगताप महाराजांनी केले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात केंद्र प्रमुख कल्याण पुराणिक यांनी श्रीगुरूचरित्राचे वाचन केले. तर, सायंकाळच्या सत्रात पुण्याच्या अवंतिका टोळे यांचे कीर्तन रंगले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर