शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

बालोद्यानने टाकली कात

By admin | Updated: January 17, 2015 02:44 IST

शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक असलेल्या सेमिनरी हिल्सवरील बालोद्यान कात टाकत आहे. उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांऐवजी आता नवीन खेळणी बदलविण्याचे ...

नागपूर : शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक असलेल्या सेमिनरी हिल्सवरील बालोद्यान कात टाकत आहे. उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांऐवजी आता नवीन खेळणी बदलविण्याचे आणि रंगरंगोटी करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांसह पालकांची गर्दी सुद्धा वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर वन विभागाने बालोद्यानमध्ये नवीन खेळणी व इतर साहित्यासाठी डिसेंबरमध्ये ४० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)कडून निधी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. शहरातील मुलांसाठी खेळण्याच्या मैदानाची आवश्यकता लक्षात घेता डीपीसीने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी प्रदान केली होती. विभागीय कार्यालयातील सूत्रांनुसार नागपुरात केंद्र सरकारची एक सोसायटी कार्यरत आहे. या सोसायटीकडे खेळ साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सींची नोंदणी आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार रोखण्यासाठी संबंधित सोसायटीच्या माध्यमातून खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. निधी मिळताच येथील लहान मुलांच्या तुटलेल्या खेळणी बदलवून त्याजागी नवीन खेळणी बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच उद्यानाला आणखी सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)