शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धर्म केल्याने आत्मिक शुद्धी होते

By admin | Updated: July 26, 2016 02:24 IST

मुनिश्री प्रतीकसागर महाराजांचा चातुर्मास श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिरात सुरू आहे.

मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचा उपदेश नागपूर : मुनिश्री प्रतीकसागर महाराजांचा चातुर्मास श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिरात सुरू आहे. मुनिश्रींनी सोमवारी प्रवचन देताना सांगितले की, धर्माचे दोन प्रकार आहेत. द्रव धर्म आणि भाव धर्म. जो तन आणि वचनाला शुद्ध करतो तो द्रव धर्म आहे. जो मनाला पवित्र करतो तो भाव धर्म आहे. परंतु मान धर्म हा दुखाच्या खाईत पोहोचवितो. जसा बगळा एका पायावर उभा राहून कधी भक्ष्य येते आणि कधी मी खातो, तसे मनाच्या वश होऊन ज्या धर्मक्रियेत पापाचा भाव असतो ती धर्माची क्रिया होऊच शकत नाही. द्वेषाच्या भावनेतून केलेले कोणतेही काम धर्म होऊ शकत नाही. रावण तत्त्वज्ञानी होता. परंतु तो मी खूप शक्तिवान आहो, असा विचार करीत होता. मला इंद्रही घाबरतो, असा विचार तो करायचा. हीच माणसाची खरी चूक आहे. त्यामुळे कधीच कोणाला कमी समजू नका. एका मुंगीत हत्तीच्या सोंडेत घुसून त्याचा पराभव करण्याची क्षमता आहे. आपण दुसऱ्याला नेहमीच तुच्छ समजतो. परंतु छळ आणि मानाचा व्यापार जास्त दिवस चालत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी दीपप्रज्वलन संतोष नेताजी, संतोष कवडे, नरेंद्र तुपकर यांनी केले. मंगलाचरण पंकज बोहरा यांनी केले. पाद प्रक्षालन आणि शास्त्रभेट सुधीर आग्रेकर परिवाराने केले. मुनिश्रींचे प्रवचन मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)