शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

नागपुरात कुत्र्यांमुळे मनोरुग्णांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:41 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे. ही कुत्री रुग्णांना जिथे ठेवले जाते त्या वॉर्डाच्या परिसरापासून ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत सर्वत्र दिसून येतात. काही मनोरुग्ण या कुत्र्यांच्या मागे धावतात, त्यांंना पकडतात, अशा वेळी ...

ठळक मुद्देरुग्णालयात २० वर बेवारस कुत्रीवॉर्ड ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत मोकाट संचार

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे. ही कुत्री रुग्णांना जिथे ठेवले जाते त्या वॉर्डाच्या परिसरापासून ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत सर्वत्र दिसून येतात. काही मनोरुग्ण या कुत्र्यांच्या मागे धावतात, त्यांंना पकडतात, अशा वेळी ही कुत्री त्यांना चावा घेण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण अशा गोष्टी सांगत नाही. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे, मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे.वाढत्या ताणतणावामुळे स्क्र ीझोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या वाढत आहे. सध्या प्रादेशिक मनोरुग्णालयात सुमारे सहाशेवर पुरुष व महिला रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु वेड्यांकडे काय लक्ष द्यावे, याच भावनेतून रुग्णालयाचा कारभार अद्यापही सुरू असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात दोन मनोरुग्णाचा गळा दाबून हत्या व एका अल्पवयीन रुग्णावर झालेल्या अत्याचारामुळे रुग्णालय प्रशासन पुरते हादरून गेले आहे. यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू असताना रुग्णाच्या नोंदणी शुल्काचा घोटाळा समोर आला आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष रुग्णालयाकडे लागले आहे. रुग्णालयातील आतील बारीकसारीक माहितीही बाहेर येऊ लागली आहे.नुकताच एका रुग्णाचा नातेवाईक रुग्णाला भेटायला रुग्णालयात गेला असताना त्याचे स्वागत तेथील कर्मचाºयाने न करताच मोकाट कुत्र्यांनी केले. रुग्णालयाच्या दारापासून ते रुग्णाच्या वॉर्डापर्यंत सर्वत्र कुत्री त्यांना दिसून आली. काही रुग्ण तर या कुत्र्यांच्या मागे धावतानाही दिसले. अशा वेळी कुत्र्यांनी चावा घेतल्यास आणि रुग्णाने याची माहिती कुणाला न दिल्यास रॅबीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्वच्छतेचाही विषय आहे, असेही त्या नातेवाईकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष का?मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत असली तरी रुग्णालय प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. बाह्यरुग्ण विभागात तर एका कुत्र्याने पिल्ले दिले असून, ती आपल्या पिल्ल्यांसह तिथेच राहते. मात्र कर्मचाºयांपासून ते वरिष्ठांपर्यंत कोणी तिला बाहेर काढत नाही, हे विशेष.