शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला द्यायचे कारण सांगून मागितले होते इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:13 IST

राजेश भोजेकर चंद्रपूर : नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याचे पाच इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्याचा पुरवठादेखील आनंदवन ...

राजेश भोजेकर

चंद्रपूर : नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याचे पाच इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्याचा पुरवठादेखील आनंदवन येथील रुग्णालयाला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दिशेनेदेखील तपासाची चक्रे फिरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे बाहेर निघाल्या नव्हत्या. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या. परंतु त्या दिवशी मात्र त्या बाहेरच आल्याच नाहीत.

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला पाच दिवसाचा कालावधी लोटूनही मृत्यूचे गूढ उकलले नाही. परंतु डाॅ. शीतल आमटे यांनी मृत्यूपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून नागपूर येथून पाच इंजेक्शन मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे, मात्र त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. यामुळे मृत्यूचे कारण रहस्यमय बनले आहे. मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही तोपर्यंत डाॅ. शीतल आमटे यांची आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणाने केली, याचा शोध लावणे अवघड झाले आहे. डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली वा अन्य कारणाने मृत्यू झाला, याचाच शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरींज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाईल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. याचा ताळमेळ डाॅ. शीतल यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाशी जोडण्याचे काम पोलीस करीत असल्याचे समजते.

पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

डाॅ. शीतल यांच्या मृत्यूप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी काही पुरावे चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

उजव्या हाताला इंजेक्शनची खूण असल्याने संभ्रम

डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू विषारी इंजेक्शन टोचल्याने झाल्याचा संशय पोलीस वर्तवत आहेत. इंजेक्शनची खूण त्यांच्या उजव्या हाताला असल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. डाॅ. शीतल आमटे या डावखुऱ्या नव्हत्या. मग त्यांनी उजव्या हाताला इंजेक्शन कसे घेतले? ही बाब पोलिसांना विचार करायला लावणारी असल्याचे समजते. यामागे अन्य कारण तर नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. यासाठी पोलीस यंत्रणा विविध पातळीवर तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे.