शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान हक्क व अधिकारांचे दस्तऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:14 IST

भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल.

ठळक मुद्देवैशाली डोळस : संविधान व महापुरुषांचे दैवीकरण करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल. तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा दैवत्व बहाल करण्याच्या नादी लागू नका. ते महापुरुष आहेत. त्यांना महापुरुषच राहू द्या, असे रोखठोक मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली डोळस यांनी येथे केले.१९४२ च्या महिला क्रांती परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघ व संथागार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर तीन दिवसीय अ.भा. महिला क्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी या परिषदेच्या दुसºया दिवशी मागासवर्गीय व अल्पसंख्याक महिला आणि भारतीय संविधान या विषयावर पहिले चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.वैशाली डोळस म्हणाल्या, प्रगतशील समजल्या जाणाºया इंग्लंडमधील महिलांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागले. परंतु भारतातील महिलांना हा अधिकार संविधानाने न मागता बहाल केलेला आहे, ही महत्त्वाची बाब समजून घेतली पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्याला सर्व काही दिले आहे. महिलांनी संविधानाचा अभ्यास करावा. आपले अधिकारी व हक्क काय हे जाणून घ्यावे तेव्हाच खºया अर्थाने आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. संविधानाने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य कुणी हिरावून घेत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उचला, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलेयवतमाळच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनंदा वालदे यांनी महिलांचे अधिकार आपल्या घरातही नाकारले जात असल्याचा मुद्द उपस्थित करीत याविरुद्ध घारापासूनच आवाज उचलण्याचे आवाहन केले. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. निर्मला सोनी यांनी महिलांनी मानसिक व धार्मिक गुलामीतून स्वतंत्र होण्याचे आवाहन केले.कर्नाटकच्या ज्योती सत्यशीला यांनी देशात विविध भागात दलितांवर अन्याय हेतो, अशावेळी देशभरातील दलितांनी एकत्र येऊन आवाज उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.ममता बोदेले यांनी संचालन केले डॉ. वृषाली रणधीर यांनी आभार मानले.