शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

डॉक्टरांच्या मानसिक तपासणीचा मेडिकलला विसर

By admin | Updated: February 27, 2017 02:03 IST

निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणाऱ्या नैराश्यामधून गेल्या दोन वर्षांत

डॉक्टरांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी होणार होते प्रयत्न : मार्डच्या विनंतीला दिली होती मंजुरी सुमेध वाघमारे  नागपूर निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणाऱ्या नैराश्यामधून गेल्या दोन वर्षांत राज्याच्या विविध मेडिकल कॉलेजच्या आठ डॉक्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने दरवर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या होत्या. परंतु वर्ष होऊनही निवासी डॉक्टरांची मानसिक तपासणी झालीच नाही. आरोग्याच्या आणि सोई-सुविधांच्या प्रश्नावरून राज्यातील निवासी डॉक्टर नेहमी आंदोलन करीत असतात. मात्र, निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. यातच बहुतांश मेडिकलमध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या, त्यांच्या सोयींचा अभाव, वाढलेले कामाचे तास, त्यातून येणारा ताण, वेळी-अवेळी झोप यामुळे निवासी डॉक्टर विविध विकारांच्या विळख्यात सापडतात. यातून आलेल्या नैराश्यामुळे २०१५ मध्ये मुंबई, पुणे, आंबेजोगाई, औरंगाबाद व नागपुरातील मेडिकलच्या पदव्युत्तर (पीजे) विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आॅक्टोबर २०१५ मध्ये दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या पाच निवासी डॉक्टरांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने सहा महिन्यांसाठी त्यांना निलंबित करण्यात आले होते. जानेवारी २०१६ मध्ये औरंगाबाद येथील निवासी डॉक्टराने आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या काही दिवसांतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. यात त्याचा मृत्यू झाला. याची दखल सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंधडा यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकला दर सहा महिन्यातून एकदा निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. हा प्रस्ताव वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चेस्तव ठेवण्यात आला. यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे व प्रत्येक वर्षात आवश्यकतेनुसार संबंधित निवासी डॉक्टराची शारीरिक व मानसिक आरोग्य तपासणी करावी व त्यास अनुसरून समुपदेशन करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला. परंतु वर्षे झाले निवासी डॉक्टरांची तपासणीच झाली नाही.