शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला खंडणीसाठी धमकी

By admin | Updated: June 4, 2016 02:47 IST

एका दंतचिकित्सकाकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली.

जिवे मारण्याचा इशारा : तिघे गजाआडनागपूर : एका दंतचिकित्सकाकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार डॉक्टरकडील एक माजी कर्मचारीच निघाला. तो अट्टल गुन्हेगार आहे. लोकमत चौकात डॉ. सुधीर रमेश मेश्राम (वय ३४) यांचे राधारतन क्लिनिक आहे. डॉ. मेश्राम १८ मे रोजी आपल्या क्लिनिकमध्ये असताना दुपारी १२ वाजता त्यांना ७७२१०६३५७८ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. पलिकडून बोलणाऱ्या आरोपीने दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम दिली नाही तर जिवे मारू, अशी धमकीही दिली. दुसऱ्या दिवशीसुद्धा असाच फोन आला. मात्र, डॉक्टरने त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. २८ मे च्या रात्री ९ च्या सुमारास तीन आरोपी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आले. क्लिनिकमध्ये तोडफोडनागपूर : मेश्राम यांच्याकडे काम करणाऱ्यांकडे डॉक्टरबाबत विचारणा केली. डॉक्टर हजर नसल्याचे कळाल्याने क्लिनिकमध्ये तोडफोड केली. ‘काट डालेंगे’अशी धमकी देऊन पळून गेले. या प्रकरणाची तक्रार डॉ. मेश्राम यांनी गुरुवारी धंतोली ठाण्यात नोंदवली. ठाणेदार राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चित्रा मेसरे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉक्टरच्या क्लिनिकमधील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल नंबरवरून आरोपींचा शोध सुरू केला. नमूद क्रमांकाच्या मोबाईलचा वापर आरोपी मुकेश रामाजी गुप्ता (वय २२) करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी मुकेशला आणि त्याच्या माहितीवरून सुनील श्रीकांत पांडे (वय २०) तसेच संजय छन्नू डिंडोरे (वय २१, तिघेही, रा. सुरेंद्रगड, गिट्टीखदान) यांनाही पकडले. त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा ८ जूनपर्यंत पीसीआर मिळवल्याची माहिती सहायक आयुक्त एन. डी. इंगोले यांनी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)