ंमेयो, मेडिकल : निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा कोलमडलीनागपूर : एन्टर्नशिप (आंतरवास) करणाऱ्या डॉक्टरांना त्रास देत असलेल्या नागपूर येथील तत्कालीन विभागप्रमुखांच्या विरोधात एका महिन्यात विभागीय चौकशी अहवाल तयार करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रस्तावित वेतनवाढ, रजा, बॉण्ड या इतर मागण्यांसाठी राज्यभरातील चार हजार निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून बेमुदत संपावर गेले. संपाचा पहिला दिवस असल्याने मेयो व मेडिकल प्रशासनाने वरिष्ठ डॉक्टरांपासून ते इन्टर्न डॉक्टरांकडून नियोजनबद्ध पद्धतीने कामे करून घेतली. यामुळे शस्त्रक्रियांपासून ते बाह्यरुग्ण विभाग व आकस्मिक कक्षात नेहमीची कामे सुरळीत सुरू होती, फटका बसला तो वॉर्डातील रुग्णांना. विशेषत: रात्रीच्यावेळी वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टरांसह रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागली.मेडिकलच्या एका प्राध्यापकांकडून शिकाऊ डॉक्टरच्या झालेल्या मानसिक छळाच्याविरोधात महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडन्ट डॉक्टर्सकडून (मार्ड) सातत्याने आंदोलन होत आहे. यासंदर्भात जूनमध्ये दोन वेळा संपाची हाकही देण्यात आली होती. संबंधित प्राध्यापकांवर योग्य कारवाईचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याने हे संप मागे घेण्यात आले. परंतु, त्या प्राध्यापकाच्या बदलीव्यतिरिक्त इतर कोणतीही हालचाल झाली नाही. परिणामी मार्डचे डॉक्टर गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले. निवासी डॉक्टर हे मेडिकल व मेयोचा कणा आहे. ते संपावर गेल्याने या दोन्ही रुग्णालयाच्या प्रशासनाला कामाचे नियोजन करण्याची वेळ आली. असे असतानाही, रुग्णांना उपचार मिळण्यास उशीर होत होता. मोजकेच वरिष्ठ डॉक्टर आणि हजाराच्यावर रुग्ण असल्याने योग्यपद्धतीने उपचार देण्यास मेयो आणि मेडिकल कमी पडत असल्याचे चित्र होते. सर्वात जास्त फटका बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांना बसला. अर्धवट उपचार करून पुन्हा दोन-तीन दिवसानंतर येण्यास सांगितले जात होते. परंतु अनेक रुग्ण मेडिकल आणि मेयोच्या परिसरात संप बंद होण्याच्या प्रतीक्षेत तळ ठोकून आहेत.-५७७ डॉक्टरांवर मेडिकलच्या हजारो रुग्णांचा भारमेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी निवासी डॉक्टरांचा संप लक्षात घेऊन विविध फॅकल्टीचे ३३० शिक्षक, २०० इन्टर्न्स, २७ निवासी डॉक्टर तर २० वैद्यकीय अधिकारी असे ५७७ डॉक्टरांच्या कामांचे नियोजन एक दिवसापूर्वीच केले होते. यामुळे संपाचा पहिल्या दिवस विशेष अडचणीचा गेला नाही, मात्र रात्री मात्र अनेक वॉर्डात वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागली.(प्रतिनिधी)
डॉक्टर संपावर; रुग्ण वाऱ्यावर
By admin | Updated: July 3, 2015 03:14 IST