शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरने बालमित्राच्या उपचाराचे ७ लाख केले माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

नागपूर : उमरेड रोडवर त्यांचा अपघात झाला. उपचारासाठी हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी उपचारही केले. दरम्यान, उपराचारासाठी येणाऱ्या खर्चाची जुळवाजु‌ळव करण्यासाठी ...

नागपूर : उमरेड रोडवर त्यांचा अपघात झाला. उपचारासाठी हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी उपचारही केले. दरम्यान, उपराचारासाठी येणाऱ्या खर्चाची जुळवाजु‌ळव करण्यासाठी कुटुंबीयांची चिंता वाढली. पण अशातच दुनियारी सोडून ‘दोस्ती’ कामी आली. रुग्ण बालमित्र असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी पूर्ण उपचार करून तब्बल सात लाख रुपयांचे बिल माफ केले. मित्राला असे अनोखे ‌‘फ्रेण्डशिफ्ट गिफ्ट’ देत मैत्रीचा धागा आणखी घट्ट केला.

उमरेड रोडवर २७ जुलै रोजी एका चारचाकीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. त्यात मागील दुचाकीवर असलेले केशवराव शेंडे व खासगी आयटीआयचे प्राचार्य अनिकेत शेंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत मेडिक्युअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे दोन्ही हात, एक पाय फ्रॅक्चर झाला. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आदित्य बोथरा यांनी एका पायाचे ऑपरेशन केले. उपचारादरम्यान अनिकेत शेंडे हे तर आपले बालमित्र असून आपण एकाच शाळेत शिकलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक वर्षांनंतर मित्राची भेट एक पेशंट म्हणून झाली. त्यानंतर डॉ. बोथरा यांनी आठ दिवस शेंडे यांच्यावर उपचार केले. सुटी देताना हॉस्पिटलने शेंडे यांच्याकडे बिलाची मागणी केली नाही. त्यावर शेंडे कुटुंबीयांनी डॉ. बोथरा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पैसे घेण्यास नकार देत मित्राला फ्रेण्डशिप गिफ्ट दिल्याचे सांगितले. हे ऐकून शेंडे कुटुंबीयांना गहिवरून आले. शेवटी त्यांनी डॉ. बोथरा यांना विनंती करून किमान एक लाख रुपये घेण्यास भाग पाडले.