शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या विरोधात डॉक्टर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:31 IST

‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे. असे असताना केंद्र सरकारने मांडलेले व लोकसभेत संमत झालेल्या ‘एनएमसी’ विधेयकाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) विरोध करीत देशव्यापी संप पुकारला आहे. यात नागपुरातील खासगी डॉक्टर ३१ जुलैपासून २४ तास संपावर जाणार आहेत. या संपातून आकस्मिक रुग्णसेवेला वगळण्यात आले आहे.

ठळक मुद्देआकस्मिक रुग्णसेवेला वगळले : ओपीडी, एक्स-रे, पॅथालॉजी असणार बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे. असे असताना केंद्र सरकारने मांडलेले व लोकसभेत संमत झालेल्या ‘एनएमसी’ विधेयकाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) विरोध करीत देशव्यापी संप पुकारला आहे. यात नागपुरातील खासगी डॉक्टर ३१ जुलैपासून २४ तास संपावर जाणार आहेत. या संपातून आकस्मिक रुग्णसेवेला वगळण्यात आले आहे.‘नॅशनल मेडिकल कमिशन’ विधेयकामुळे शिकाऊ डॉक्टरांच्या हिताला बाधा पोहचत आहे. हे विधेयक गरीब आणि विद्यार्थीविरोधी आहे. यात लोकशाहीअंतर्गत कुठलीही प्रक्रिया न करता ८० टक्के सदस्यांची निवड करण्याची तरतूद आहे; शिवाय वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेल्यांना देखील या कमिशनमध्ये स्थान मिळणार आहे. सोबतच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० टक्के जागांवरील शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य त्या महाविद्यालयांना देण्यात येण्याची तरतूद आहे. यामुळे गरीब घरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महागणार आहे. याचा विरोध म्हणून ‘आयएमए’ने संपाचे हत्यार उपसल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सांगितले. बुधवारला सकाळी ८ वाजतापासून २४ तासांसाठी खासगी डॉक्टर संपावर जाणार आहेत. संपात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), एक्स-रे, पॅथालॉजी बंद ठेवले जाणार आहे. केवळ आकस्मिक रुग्णांवर उपचार केले जातील, असेही डॉ. झुनझुनवाला यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप