शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

‘काळे’ पाणी प्यायचे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:33 IST

औद्योगिकीकरणामुळे बुटीबोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पाणीपुरवठा केला जातो.

ठळक मुद्देबुटीबोरीच्या दोन वॉर्डातील नागरिकांचा सवाल : नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा, नागरिक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबुटीबोरी : औद्योगिकीकरणामुळे बुटीबोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून वॉर्ड क्रमांक-१ आणि २ मधील नागरिकांच्या घरी असलेल्या नळांना काळेकुट्ट पाणी येत असल्याने तसेच सदर पाणी पिण्यासाठी तर सोडाच कोणत्याही कामासाठी वापरण्यायोग्य नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे ‘काळे पाणी प्यायचे का’, असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला आहे.बुटीबोरी येथीन वॉर्ड क्रमांक-१ व २ मधील घरांमध्ये असलेल्या नळांना मागील काही दिवसांपासून काळ्या रंगाचे पाणी येत आहे. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नळाला रोजच काळे पाणी येत असल्याने तसेच पिण्यासह वापरण्यासाठी लागणारे पाणी आणायला भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी याबाबत त्यांच्या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्यांना कळविले तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, प्रशासनाने यावर कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.ही समस्या सोडविण्यासाठी बुटीबोरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसूफ शेख यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकाºयाला मागण्यांचे निवेदन देऊन ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. जोशी यांच्याशी या समस्येवर चर्चा केली आणि ती सोडविण्याची मागणी केली.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना पाठविण्यात आल्याचे युसूफ शेख यांनी सांगितले. बुटीबोरी येथे डेंग्यू, टायफाईड, मलेरिया तसेच स्वाईन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नळाच्या काळ्या पाण्याने भर टाकली आहे. या पाण्याचा वापर कपडे किंवा भांडी धुण्यासाठी करणे शक्य नाही. मग ते पिण्यासाठी कसे वापरायचे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला.या सर्व समस्यांकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप काही नागरिकांनी केला असून, नळाला येणाºया काळ्या पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिष्टमंडळात युसूफ शेख, राजू गावंडे, राहुल पटले, रोहित कुकडे आदीेंचा समावेश होता.या आहेत मागण्यासर्व हॅण्डपंपजवळील परिसराची साफसफाई करून पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावे, सार्वजनिक विहिरींची व विहिरींच्या परिसराची साफसफाई करून विहिरींमधील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावे, प्रत्येक वॉर्डात डासांची पैदास वाढल्याने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी अथवा धुरळणी करावी, नळाला येणाºया दूषित पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, गावातील नाल्यांची साफसफाई करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, जुन्या वस्तीतील गोदामाजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावून त्या परिसराची साफसफाई करावी, जुन्या वस्तीतील काही रस्त्यांलगत कचरा साचला असून, त्याची विल्हेवाट लावावी, रोडवरील खड्डे बुजवावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.