शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काम करा नाही तर घरी बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:03 IST

थकीत मालमत्ता आणि पाणीकर असणाऱ्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे.

अभय योजनेत १०० टक्के करवसुलीचे लक्ष्य : आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत मालमत्ता आणि पाणीकर असणाऱ्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. ती केवळ ग्राहकांसाठीच नाही तर यात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा होणार आहे. केवळ आठ तास कामाची मानसिकता सोडा, कर वसुलीसाठी २४ तास काम करा. या योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांक न करण्यात येईल. काम करा नाही तर घरी बसा अशी भूमिका महापालिका प्रशासनाची राहणार आहे, असा इशारा अश्विन मुद्गल यांनी सोमवारी महापालिकेच्या मंगळवारी झोन येथे आयोजित बैठकीत दिला. थकबाकीदारांसाठी १७ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान अभय योजना राबविली जात आहे. मागील पाच दिवसांपासून स्थायी समिती सभापती संदीप जाधव, अश्विन मुद्गल आणि जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे हे झोननिहाय बैठका घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून १०० टक्के करवसुली करण्यासाठी प्रयत्न करीत आहते. सोमवारी आसीनगर आणि मंगळवारी झोन येथे बैठक घेण्यात आली. योजनेचा कालावधी मोठा आहे. जे करदाते एकाच दिवशी पूर्ण रक्कम भरू शकत नसेल तर दररोज टप्प्याटप्प्यात रक्कम भरता येईल. या सवलतीचा लाभ घेऊन आपली पाटी कोरी करा, असे आवाहन संदीप जाधव यांनी केले. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या सायबर टेक कंपनीबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले. यापुढे तक्रारी आल्या तर कंत्राटाबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी झोन सभापती सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, नगरसेविक संगीता गिऱ्हे, अर्चना पाठक, रश्मी धुर्वे, संजय बुरेवार, नरेंद्र वालदे, सुनील अग्रवाल, राजेश घोडपागे, नेहा निकोसे, भावना लोणारे, दिनेश यादव, मनोज सांगोळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, सहायक अधीक्षक महेंद्र जनबंधू आदी उपस्थित होते.