शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
2
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
3
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
4
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
5
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
6
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
7
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
8
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
9
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
10
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर
11
"...तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल", शरद पवारांचे मराठा आरक्षणाबद्दल केंद्राकडे बोट
12
‘कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो', अमेरिकन टॅरिफवरुन राजनाथ सिंह यांचे मोठे विधान
13
Manoj Jarange Patil: शिंदे समितीने मनोज जरांगेंची घेतली भेट, आझाद मैदानातील उपोषणस्थळीच चर्चा
14
Gauri Pujan 2025: तुमच्या घरी गौरी गणपती असतील तर नैवेद्याच्या वेळी पडदा लावता ना? कारण...
15
Asia Cup 2025 सुरू होण्याआधीच आली मोठी अपडेट; IND vs PAK सामन्यावरही होणार परिणाम
16
EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन
17
प्रेमप्रकरणावरून संतापलेल्या बापानं पोटच्या मुलीलाच संपवलं, मग आत्महत्या दाखवण्यासाठी भलतंच नाटक रचलं; पण...
18
आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक
19
"आता तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?; दोन समाजात आगी लावून...!" संजय राऊतांचा फडणीसांवर थेट हल्ला
20
Raj Thackeray: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; राज ठाकरेंनी एका वाक्यातच दिलं उत्तर, कुणाला धरलं धारेवर?

कारवाई नको, लग्नच लावून द्या!

By admin | Updated: November 27, 2015 03:05 IST

वर्षभरापासून आमचे संबंध आहेत. त्याने लग्न करू असे सांगितले होते. त्यामुळे आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले.

प्रेमसंबंधाचा अतिरेक : तक्रारकर्तीच्या मागणीने पोलीस पेचातनरेश डोंगरे नागपूरवर्षभरापासून आमचे संबंध आहेत. त्याने लग्न करू असे सांगितले होते. त्यामुळे आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. अगदी पती-पत्नीसारखे आम्ही वागत होतो. आता मात्र तो लग्नास नकार देतो. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येईल का, असा प्रश्न करणाऱ्या महिलेला पोलीस लगेच हो म्हणून उत्तर देतात. यानंतर काही वेळेतच ती महिला ‘साहेब, कारवाई नका करू, त्यापेक्षा त्याला चार-दोन ठेवून आमचे लग्नच लावून द्या’ , अशी मागणी करते. एमआयडीसी आणि इमामवाड्यातील ताज्या प्रकरणात अशाच प्रकारची मागणी झाली आहे. बलात्काराच्या प्रकरणात अलीकडे ही मागणी वाढल्याने पोलिसांची चांगलीच गोची होत आहे. अविवाहित तरुण-तरुणीच नव्हे तर विवाहित महिला-पुरुषही ‘प्रेमसंबंधाच्या नावाखाली’ मर्यादा सोडतात. दोन्हीकडून वाजवी अपेक्षा असेपर्यंत महिनोमहिने हे मधुर (अनैतिक !) संबंध सुरू राहतात. मन भरले किंवा अवाजवी मागण्या झाल्या की संबंधात कटुता येते. नंतर हे प्रकरण भलत्याच वळणावर जाते. ‘त्याला‘ धडा शिकविण्याच्या हेतूने ती पोलीस ठाण्यात पोहचते. पोलीस तिची तक्रार ऐकून गुन्हा दाखल करण्याची, अर्थात कारवाईची प्रक्रिया सुरू करतातचार दिवसांपूर्वी घडलेल्या दोन प्रकरणातून पुन्हा ही मागणी पुढे आल्यामुळे पोलिसांची चांगलीच गोची झाली आहे.ते पती-पत्नीसारखे राहायचेकारवाई नको, लग्नच लावून द्या!नागपूर : दुसरे प्रकरण इमामवाड्यातील दोघेही तेथेच राहतात. त्यांचे प्रेमप्रकरण वर्ष-दीड वर्षांपासून सुरू होते. सहा महिन्यांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करून तिने त्याचा हात धरत आपले घर सोडले. तेव्हापासून ते पती-पत्नीसारखे राहात होते. आता मात्र दोघांचे बिनसले. त्यामुळे ही तरुणी चार दिवसांपासून इमामवाडा पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, याची कल्पना आल्यामुळे ती घुटमळत आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याऐवजी त्याने आपल्याशी लग्न केले तर त्याला अन् मलाही त्रास होणार नाही, असा युक्तिवाद करून ती पोलिसांना ‘त्याला‘ लग्न करण्यासाठी तयार करण्याची मागणी करीत आहे. तिसरे प्रकरण : अंबाझरीत असेच एक प्रकरण घडले होते. दोघेही एकत्र राहत होते. काही दिवसानंतर त्यांच्यात कटुता आली. त्यामुळे तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तेव्हा त्याच्यापेक्षा हीच जास्त अस्वस्थ झाली. त्याला तात्काळ बाहेर काढा, अशी मागणी त्यावेळी तिने नोंदवली होती. त्याच्यासाठी ती घरून जेवणाचा डबाही आणत होती. दोन आठवड्यांपूर्वी एमआयडीसीतही असाच प्रकार घडला होता. ही चार उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. बलात्काराची तक्रार घेऊन येणारी महिला किंवा तरुणी ‘साहेब, आमचे लग्नच लावून द्या’, अशी आग्रही मागणी बहुतांश प्रकरणात करतात. अशा केसेस अनेक पोलीस ठाण्यात येत असल्याचा अनुभव अनेक पोलीस अधिकारी सांगतात. युवतींच्या अशा मागणीमुळे आमची मानसिक कोंडी होते अन् पुढे नोकरीवर गदा येण्याचा धोकाही असतो. मात्र, माणुसकी आणि ‘त्या‘ दोघांचे भविष्य लक्षात घेत काही वेळा त्यांची जन्मगाठ बांधून देण्याची व्यवस्था आम्हाला करावी लागते, असेही काही पोलीस अधिकारी सांगतात.पालकांची भूमिका महत्त्वाची !असे प्रकरण प्रसंगी कोणत्याही वळणावर जाऊ शकते. बदनामीच्या धाकापोटी किंवा पश्चातापामुळे नंतर संबंधित तरुण, तरुणी किंवा महिला, पुरुष यापैकी कुणी आत्महत्याही करू शकतो. त्यामुळे अशा प्रकरणात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया महिला, मुलींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची बागडे यांनी नोंदविली आहे. असेच एक प्रकरण बागडे गेल्या पाच दिवसांपासून हाताळत आहेत. त्यांच्या समुपदेशनामुळेच एका तरुणीचा जीवही वाचला अन् दोन्ही कुटुंबातील तेढही कमी झाली आहे. पालकांनी आपल्या तरुण पाल्यांवर आणि समाजाने आपल्या आजूबाजूच्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कुणाचे पाऊल वाकडे पडत असेल आणि वेळीच त्याचे योग्य समुपदेशन झाल्यास त्याला सावरता येते, असेही बागडे म्हणतात.१) ती सावनेरची. तो सौंसर (छिंदवाड्याचा). दोघेही वेगवेगळ्या कंपनीत फिल्ड जॉब करणारे. नोव्हेंबर २०१४ मध्ये छिंदवाड्यात त्यांची बसमध्ये ओळख झाली. ही ओळख मैत्रीत रुपांतरित झाली. मैत्री बहरतच गेली अन्..‘ लग्न करू‘ असे म्हणत त्यांनी मर्यादा ओलांडली. तिने कंपनी सोडून नर्सचे प्रशिक्षण सुरू केले तर, त्यानेही आपले गाव, कंपनी सोडून बुटीबोरीत नवीन काम धरले. हे दोघेही भाड्याच्या खोलीत पती-पत्नीसारखे वागत होते. काही दिवसांपूर्वी तो बाहेरगावी जातो, असे म्हणत नागपुरातून गेला. चुकून त्याचा मोबाईल तिच्या रूमवर राहिला. त्यावर वारंवार एका तरुणीचे फोन, मेसेज येत असल्याने ‘तो दुसरीकडे कनेक्ट‘ असल्याचे ‘हिच्या‘ लक्षात आले. त्यामुळे तिने लग्नासाठी तगादा लावला. पोलिसांकडेही जाण्याचा धाक दाखवला. त्याने दाद दिली नसल्यामुळे ती ठाण्यात पोहचली. बलात्काराची तक्रार देतानाच ‘त्याने लग्न केले तर त्याच्यावर कारवाई करू नये, असे स्पष्ट करतानाच त्याला समजावण्याची जबाबदारीही पोलिसांवर टाकण्याचा प्रयत्न केला. ते पती-पत्नीसारखे राहायचेनागपूर : दुसरे प्रकरण इमामवाड्यातील दोघेही तेथेच राहतात. त्यांचे प्रेमप्रकरण वर्ष-दीड वर्षांपासून सुरू होते. सहा महिन्यांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करून तिने त्याचा हात धरत आपले घर सोडले. तेव्हापासून ते पती-पत्नीसारखे राहात होते. आता मात्र दोघांचे बिनसले. त्यामुळे ही तरुणी चार दिवसांपासून इमामवाडा पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, याची कल्पना आल्यामुळे ती घुटमळत आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याऐवजी त्याने आपल्याशी लग्न केले तर त्याला अन् मलाही त्रास होणार नाही, असा युक्तिवाद करून ती पोलिसांना ‘त्याला‘ लग्न करण्यासाठी तयार करण्याची मागणी करीत आहे. तिसरे प्रकरण : अंबाझरीत असेच एक प्रकरण घडले होते. दोघेही एकत्र राहत होते. काही दिवसानंतर त्यांच्यात कटुता आली. त्यामुळे तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तेव्हा त्याच्यापेक्षा हीच जास्त अस्वस्थ झाली. त्याला तात्काळ बाहेर काढा, अशी मागणी त्यावेळी तिने नोंदवली होती. त्याच्यासाठी ती घरून जेवणाचा डबाही आणत होती. दोन आठवड्यांपूर्वी एमआयडीसीतही असाच प्रकार घडला होता. ही चार उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. बलात्काराची तक्रार घेऊन येणारी महिला किंवा तरुणी ‘साहेब, आमचे लग्नच लावून द्या’, अशी आग्रही मागणी बहुतांश प्रकरणात करतात. अशा केसेस अनेक पोलीस ठाण्यात येत असल्याचा अनुभव अनेक पोलीस अधिकारी सांगतात. युवतींच्या अशा मागणीमुळे आमची मानसिक कोंडी होते अन् पुढे नोकरीवर गदा येण्याचा धोकाही असतो. मात्र, माणुसकी आणि ‘त्या‘ दोघांचे भविष्य लक्षात घेत काही वेळा त्यांची जन्मगाठ बांधून देण्याची व्यवस्था आम्हाला करावी लागते, असेही काही पोलीस अधिकारी सांगतात.(प्रतिनिधी)पालकांची भूमिका महत्त्वाची !असे प्रकरण प्रसंगी कोणत्याही वळणावर जाऊ शकते. बदनामीच्या धाकापोटी किंवा पश्चातापामुळे नंतर संबंधित तरुण, तरुणी किंवा महिला, पुरुष यापैकी कुणी आत्महत्याही करू शकतो. त्यामुळे अशा प्रकरणात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया महिला, मुलींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची बागडे यांनी नोंदविली आहे. असेच एक प्रकरण बागडे गेल्या पाच दिवसांपासून हाताळत आहेत. त्यांच्या समुपदेशनामुळेच एका तरुणीचा जीवही वाचला अन् दोन्ही कुटुंबातील तेढही कमी झाली आहे. पालकांनी आपल्या तरुण पाल्यांवर आणि समाजाने आपल्या आजूबाजूच्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कुणाचे पाऊल वाकडे पडत असेल आणि वेळीच त्याचे योग्य समुपदेशन झाल्यास त्याला सावरता येते, असेही बागडे म्हणतात.