शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका

By admin | Updated: October 10, 2016 02:15 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले असताना आता विदर्भातील ओबीसी नेतेदेखील पुढे

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले असताना आता विदर्भातील ओबीसी नेतेदेखील पुढे सरसावले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा विरोध नाही, परंतु हे आरक्षण देत असताना ओबीसींच्या हक्काला धक्का लावू नका, या मागणीसाठी विदर्भातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांना सकारात्मक आश्वासन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षण दिले तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तसेच राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा व विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी ३ वाजता रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली. विशेष ओबीसी मंत्रालयाचे आश्वासन या बैठकीदरम्यान राज्यात विशेष ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ओबीसींच्या हक्कांचे जतन झाले पाहिजे व त्यासाठी हे मंत्रालय आवश्यक आहे. याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.