शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

४५ मिनिटांपेक्षा टीव्ही, मोबाईल पाहू नका : बालरोग तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:43 IST

लहान मुलांचे वय हे विकासाचे असते. परंतु याच वयात सर्वाधिक मुलांचा वेळ हा टीव्ही, मोबाईल पाहण्यात जातो. यामुळे मेंदूला नुकसान पोहचते. विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. लहान मुलांनी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.

ठळक मुद्दे‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ची नवीन कार्यकारिणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान मुलांचे वय हे विकासाचे असते. परंतु याच वयात सर्वाधिक मुलांचा वेळ हा टीव्ही, मोबाईल पाहण्यात जातो. यामुळे मेंदूला नुकसान पोहचते. विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. लहान मुलांनी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ नागपूर शाखेची नव्या कार्यकारिणीची माहिती देण्यासाठी मंगळवारी परिषदेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नवनियुक्त अध्यक्ष डॉ. रवींद्र भेलोंडे , सचिव डॉ. महेश तुराळे व डॉ. दिनेश सरोज यांनी लहान मुलांच्या विकासातील अडथळे यावर प्रकाश टाकला.डॉ. सरोज म्हणाले, मोबाईल,टीव्हीपासून दूर राहण्याची जनजागृती मोहीम ‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ शाळांमध्ये राबविणार आहे. पालकांमध्येही याची जनजागृती केली जाणार आहे.‘स्वीच ऑफ द स्क्रीन, स्वीच ऑन द पॉसिबिलिटीज’, असे ब्रीदवाक्य या उपक्रमाला दिले आहे. डॉ. तुराळे म्हणाले, नव्या कार्यकारिणीने या वर्षात शैक्षणिकसोबतच मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे. विमल आश्रमातील १६० मुलांच्या आरोग्याचा भार उचलला आहे. किशोरवयीन मुलांच्या लैंगिक शिक्षणाला घेऊन सेमिनार आयोजित केले जाणार आहे. डॉ. भेलोंडे म्हणाले, राज्यात डायरिया, न्यूमोनिया हा आजार लहान मुलांसाठी आजही धोकादायक ठरत आहे. याशिवाय, डेंग्यू व कुपोषणालाही गंभीरतेने घ्यायला हवे.अशी आहे कार्यकारिणीअध्यक्ष डॉ. रवींद्र भेलोंडे, सचिव डॉ. महेश तुराळे, पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ. शुभदा खिरवाडकर, माजी अध्यक्ष डॉ. मोईन हक, माजी सचिव दिनेश सरोज, उपाध्यक्ष डॉ. शिल्पा भोयर व डॉ. गिरीश चरडे, कोषाध्यक्ष डॉ. राजकुमार किरतकर, सहसचिव डॉ. प्रवीण डहाके, डॉ. संजय देशमुख, विशेष निमंत्रित, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. दीपक गोयल, डॉ. वागीष कटारिया, डॉ. प्रशांत भुतडा व डॉ. अमित नेमाडे आदींचा सहभाग आहे.पदाधिकाऱ्यांची दांडीअकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये एकूण ३५ पदाधिकारी व सदस्य आहेत. परंतु पत्रपरिषदेला केवळ अध्यक्ष, सचिव व माजी सचिव उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या दांडीवर प्रश्न विचारला असता, पदाधिकारी कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करण्यात आले.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर