शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

दोन महिने होऊनही हृदय शस्त्रक्रिया नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:04 IST

अ‍ॅन्जिओग्राफीसाठी पाच हजार रुपये भरले, परंतु चाचणीच झाली नाही, पैसे परत मिळण्यासाठी रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहे...

ठळक मुद्देरुग्णांनी वाचला समस्यांचा पाढा : गिरीश व्यास यांची ‘सुपर’ला आकस्मिक भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅन्जिओग्राफीसाठी पाच हजार रुपये भरले, परंतु चाचणीच झाली नाही, पैसे परत मिळण्यासाठी रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहे... दारिद्र्यरेषेखालील रुग्ण आहे. परंतु अ‍ॅन्जिओग्राफी करण्यासाठी पाच हजार रुपये मागत आहे. एवढे पैसे नसल्याने उपचार थांबवून ठेवण्यात आले आहे... हृदयशस्त्रक्रियेसाठी दोन महिने होऊनही प्रतीक्षा संपली नाही... हृदयशस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात पाठविले जाते... सहामधून दोन-तीन औषधे मिळतात इतर औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात... प्रतीक्षालय नसल्याने व्हरांड्यात बसावे लागते... यासारख्या अनेक समस्यांचा पाढाच रुग्णांनी आमदार गिरीश व्यास यांच्यासमोर वाचल्याने येथे व्यवस्थापन आहे की नाही, हा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी १२.१५ वाजता आ. गिरीश व्यास यांनी अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक रुग्णाने आपली समस्या मांडण्यासाठी गर्दी केली होती. रुग्णालयातील समस्या पाहून त्यांनी सफाई कर्मचाºयांपासून ते अधिकाºयापर्यंत अनेकांना फटकारले.सीसीटीव्ही बंदआ. व्यास यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भेट दिली असता सीसीटीव्ही बंद असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याविषयी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे विचारणा केली असता केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बायोमेट्रिक सुरू आहे की नाही याचीही तपासणी केली.हृदय शल्यक्रियेच्या रुग्णाची पळवापळवीगंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाºया गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे. परंतु ‘सुपर’मध्ये हृदयशल्यक्रियेनंतर देखभाल करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे कारण खुद्द विभागप्रमुखच सांगतात व जिथे ही योजना कार्यान्वित आहे त्यातील विशिष्ट खासगी रुग्णालयात जाण्यास सांगतात, अशी तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकाने केली.मरावे की जगावे...दोन महिने झाले, परंतु हृदय शस्त्रक्रियेची प्रतीक्षा संपली नाही. आवश्यक औषधेही मिळत नाही. यामुळे मरावे की जगावे, हा प्रश्न लक्ष्मीबाई भगत या ८० वर्षीय वृद्ध महिलेने उपस्थित केला.औषध असूनही रुग्ण वंचितएका महिला रुग्णाने रुग्णालयात औषध असूनही औषधवितरक औषध देत नसल्याची तक्रार आ. व्यास यांच्याकडे केली. आ. व्यास यांनी औषधवितरकाकडे याविषयी विचारणा केली. त्याने नवीन असल्याचे सांगत, नाकारलेले औषध डब्यातून काढून रुग्णाला दिले.शुल्क भरले, पण चाचणीच झाली नाहीराजमल पांडे म्हणाले, अ‍ॅन्जिओग्राफीसाठी पाच हजार रुपये भरले, परंतु ही चाचणीच झाली नाही. आता हे पैसे परत करण्यासाठी रुग्णालयाच्या चकरा मारत आहे. आज पुन्हा २० दिवसानंतर येण्यास सांगितल्याची तक्रार मांडली.‘सुपर’चे रुग्ण अडचणीत : आ. व्याससुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या समस्या ऐकून घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना आ. व्यास म्हणाले, रुग्णालयात व्यवस्थापनच नाही. यामुळे येथील रुग्ण अडचणीत आले आहेत. रुग्णालयात सफाई कर्मचाºयांपासून ते डॉक्टर वेळेवर येत नसल्याचे, परवानगी न घेता अनुपस्थित राहत असल्याच्या अनेक समस्या आहेत. आवश्यक औषधे नाहीत, शस्त्रक्रियेची प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे, साध्या स्टेशनरीसाठी रुग्णांना वेठीस धरले जात आहे, येथील रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जात आहे, अशा अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांची वैद्यकीय शिक्षण संचालकस्तरावरून चौकशी करण्यात येईल.कुठून आणू पाच हजार रुपयेबुद्धनगर येथून आलेले विनोद उके म्हणाले, दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. दारिद्र्य रेषेखालील गटात मोडतो. तसे रेशनकार्ड आहे. डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओग्राफी करण्यास सांगितले. परंतु यासाठी पाच हजार रुपये शुल्क द्यावे लागते. एवढे पैसे नाहीत. नि:शुल्क उपचारासाठी मदत मागतोय पण कोणीच मदत करीत नसल्याची व्यथा मांडली.हजेरी लावून पळून जातात कर्मचारीरुग्णालयात ३६ सफाई कर्मचारी आहेत. त्यातील चारच कर्मचारी उपस्थित असल्याचे लक्षात आले. आ. व्यास यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.आ. व्यास यांनी नियमांना फासला हरताळहृदयशल्यक्रियेच्या वॉर्डात गंभीर रुग्ण असतात. त्यांना बाहेरच्या व्यक्तींचा संसर्ग होऊ नये म्हणून वॉर्डात जाण्यापूर्वी जोडे-चपला बाहेर काढावे लागतात. तसेच तोंडाला मास्क बांधून जाण्याचा नियम आहे. परंतु आ. व्यास हे आपल्या लवाजम्यासह नियमांना हरताळ फासत वॉर्डात पोहचले. त्यांच्यासोबत १५-२० जण होते. रुग्णांच्या जिविताला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.तीन महिन्यानंतर उघडले स्वच्छतागृहआ. व्यास यांनी हृदयशल्यचित्सकाच्या वॉर्डाला भेट दिली असता स्वच्छता गृहाची दुर्गंधी संपूर्ण वॉर्डात पसरली होती. याविषयी अधिकाºयांना विचारले असता, तब्बल तीन महिन्यापासून बंद पडलेले स्वच्छतागृहाची सफाई होत असल्याची माहिती मिळताच आ. व्यास यांनी डोक्यावर हात मारून घेतला.