शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आधारशिवाय कुणालाही एलपीजी कनेक्शन देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:54 IST

राज्य सरकारला आधारची माहिती कळविल्याशिवाय कुणालाही नवीन एलपीजी कनेक्शन देण्यात येऊ नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केंद्र सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : राज्य सरकारला माहिती कळविणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारला आधारची माहिती कळविल्याशिवाय कुणालाही नवीन एलपीजी कनेक्शन देण्यात येऊ नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केंद्र सरकारला दिला.गरजू व्यक्तींना योग्य प्रमाणात रॉकेल उपलब्ध व्हावे याकरिता हा आदेश देण्यात आला. केंद्र सरकार राज्य सरकारला रॉकेलचा कोटा देताना एलपीजी कनेक्शन नसलेल्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या लक्षात घेते. एका व्यक्तीस महिन्याला तीन लिटर याप्रमाणे कोटा निश्चित केला जातो. राज्यात रेशनकार्डवर रॉकेलचे वितरण केले जाते. रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहेत. तसेच, राज्य सरकारने एलपीजी कनेक्शन्सची पडताळणी करून एलपीजी कनेक्शन असलेल्या कुटुंबाकडील रेशनकार्डवर ते एलपीजी कनेक्शनधारक असल्याचे स्टॅम्पिंग केले आहे. पूर्वी रेशनकार्डवर अशाप्रकारचे स्टॅम्पिंग नव्हते. त्यामुळे एलपीजी कनेक्शनधारक कुटुंबेही त्यांच्याकडील रेशनकार्डवरून अवैधरीत्या रॉकेलची उचल करीत होते. परिणामी, रॉकेलचा तुटवडा निर्माण होत होता. गरजू व्यक्तींना आवश्यक रॉकेल मिळत नव्हते. दुसरीकडे राज्य सरकारचे रेशनकार्ड स्टॅम्पिंगचे काम संथ गतीने सुरू होते. त्या कारणामुळे उच्च न्यायालयाने रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा अंतरिम आदेश गेल्या महिन्यात दिला होता. परिणामी राज्यामध्ये नवीन एलपीजी कनेक्शन्ससाठी सादर १४ हजारावर अर्ज संबंधितांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे रखडले होते. या समस्येवर उपाय म्हणून उच्च न्यायालयाने मंगळवारी या अर्जदारांच्या अर्जांतील व त्यांच्या आधारची माहिती येत्या १५ दिवसांत राज्य सरकारला कळविण्यात यावी आणि त्यानंतरच त्यांना एलपीजी कनेक्शन देण्यात यावे असा आदेश केंद्र सरकारला दिला.एखाद्या व्यक्तीकडे आधार व रेशनकार्ड हे दोन्ही दस्तावेज नाहीत असे होऊ शकत नाही. कुणी व्यक्ती त्याच्याकडे ही दोन्ही दस्तावेज नसल्याचे सांगत असेल तर, ती व्यक्ती काहीतरी लपवित आहे असा त्याचा अर्थ निघतो असे न्यायालयाने हा आदेश देताना स्पष्ट केले. केंद्र सरकार राज्य सरकारला अर्जदारांच्या आधारची माहिती कळविण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेत नव्हते. दुसरीकडे राज्य सरकारने त्यांना अर्जदारांच्या आधारची माहिती मिळाल्याशिवाय नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास विरोध केला. नवीन एलपीजी कनेक्शन मागणाऱ्यांच्या आधारची माहिती मिळाल्यास रॉकेलची अवैध उचल थांबविता येईल असेही राज्य सरकारने सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हा आदेश दिला.जनहित याचिका निकालीयासंदर्भात कडूजी पुंड यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ती याचिका निकाली काढण्यात आली. ही याचिका दाखल होण्यापूर्वी शहरातील व्यक्तींना जास्त व ग्रामीण व्यक्तींना कमी रॉकेल दिले जात होते. त्यावर पुंड यांचा आक्षेप होता. न्यायालयाच्या आदेशानंतर हा भेदभाव दूर करून राज्यात सर्वत्र समान रॉकेल वितरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेशनकार्ड स्टॅम्पिंगचा मुद्दा उचलण्यात आला होता. राज्य सरकाने ते काम नुकतेच पूर्ण केले. सरकारच्या पडताळणीत राज्यामध्ये १ कोटी ५८ लाख एलपीजी कनेक्शनधारक आढळून आले आहेत. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर, तर केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAdhar Cardआधार कार्ड