शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाने खचून न जाता जिद्दीने कामाला लागा

By admin | Updated: June 1, 2017 02:31 IST

माझी आई कोराडी मंदिर परिसरात चहा विकायची. मी शाळेतून आल्यावर तिला मदत करायचो.

माझी आई कोराडी मंदिर परिसरात चहा विकायची. मी शाळेतून आल्यावर तिला मदत करायचो. त्याच मंदिरात रात्री अभ्यास करायचो. खूप शिकावे, नोकरी करावी, अशी इच्छा होती. १२ वी ला सायन्समध्ये प्रवेश घेतला. ६८ टक्के मिळाले. मला केमिकल इंजिनिअर व्हायचे होते. एलआयटीला प्रवेश मिळत होता. पण फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आपण मुलाला इंजिनिअर बनवू शकत नाही याचे दु:ख आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शेवटी पैशाअभावी प्रवेश घेऊ शकलो नाही. बीएस्सीला प्रवेश घेतला. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडालो होतो. तणावात मी बीएस्सी सेकंड इयर सोडले. गावात किराणा दुकान सुरू केले. दूध विकू लागलो. तेथे मन रमत नव्हते. शेवटी आॅटो चालवला. आपण आता इंजिनिअर होऊ शकत नाही ही एक खंत मनाला टोचत होती. पण मला मोठा व्यक्ती बनायचे होते. त्यामुळे आॅटो चालवत असताना मी छोटे मोठे कंत्राट घेऊ लागलो. मला गवत काढण्याचे पहिले काम मिळाले दोन हजार रुपयांचे. पुढे मी व्यवसाय करू लागलो. सोबतीला सामाजिक काम होते. याच सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलो. गरिबीमुळे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही याची खंत आहे. पण नैराश्यावर मात करून मी माझ्या आयुष्याची नवी वाट निर्माण केली. माझे विद्यार्थी मित्रांना एवढेच आवाहन आहे की, १० वी १२ वी च्या यशावर आयुष्याची दिशा ठरत नसते. येथे यश मिळायला हवे. पण मिळाले नाही म्हणून आयुष्य उद्ध्वस्त झाले असे समजण्याचे कारण नाही. कुठल्याही क्षेत्रात परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आपण यश मिळवू शकतो. त्यामुळे निराश होऊन, आत्महत्या करून आयुष्य संपविण्यात अर्थ नाही. या अपयशाने खचून न जाता जिद्दीने कामाला लागा. एवढीच माझी विनंती आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री, नागपूर