शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ओबीसी आरक्षणाला धक्का पोहचवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 19:30 IST

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये कायद्यानुसार आरक्षण मिळण्याचा ओबीसींचा अधिकार मारला जाईल अशी कोणतीही कृती करू नये असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्र सरकारला दिला. त्यामुळे ओबीसींना तात्पुरता दिलासा मिळाला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा अंतरिम आदेश : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील अन्यायाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये कायद्यानुसार आरक्षण मिळण्याचा ओबीसींचा अधिकार मारला जाईल अशी कोणतीही कृती करू नये असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्र सरकारला दिला. त्यामुळे ओबीसींना तात्पुरता दिलासा मिळाला.गेल्या ११ जुलै रोजी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्यासाठी १६ जुलैपर्यंत वेळ दिला होता. त्यानुसार हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले असता केंद्र सरकारने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली. त्यामुळे न्यायालयाने हा अंतरिम आदेश देऊन केंद्र सरकारला १९ जुलैपर्यंत वेळ वाढवून दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे, याकरिता अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व ओबीसी विद्यार्थिनी राधिका राऊत यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. २००५ मधील ९३ वी घटना दुरुस्ती व केंद्रीय शैक्षणिक संस्था (प्रवेशातील आरक्षण) कायदा-२००६ मधील तरतुदीनुसार शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे अनिवार्य आहे. परिणामी, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील १९३ वैद्यकीय महाविद्यालयांत केंद्रीय कोट्याच्या ४०६४ जागा आहेत. त्यापैकी २७ टक्के म्हणजे १०९७ जागा ओबीसींच्या वाट्याला यायला हव्या होत्या. परंतु, सध्या केवळ १.७ टक्के म्हणजे ६९ जागा ओबीसींच्या वाट्याला आल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना मात्र, त्यांच्या अधिकारानुसार अनुक्रमे १५ व ७.५ टक्के वाटा मिळाला आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. राहुल कुरेकार, अ‍ॅड. अमृता गुप्ता व अ‍ॅड. श्रद्धा अथरे यांनी कामकाज पाहिले.अशी आहे याचिकाकर्त्यांची विनंतीओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले नसल्यामुळे केंद्रीय कोट्यातील प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया अवैध घोषित करण्यात यावी, केंद्रीय कोट्यासाठी झालेली पहिली प्रवेश फेरी रद्द करण्यात यावी आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करून नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे.न्यायाच्या संघर्षाला पहिले यशउच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे ओबीसींना न्याय मिळवून देण्याच्या संघर्षाला पहिले यश मिळाले. ओबीसींवर आरक्षणाच्या बाबतीत गेल्या १०-१२ वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर व्हावा याकरिता लोकशाही पद्धतीने लढा देत होतो. परंतु, कुणीच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी न्यायालयाचे दार ठोठावावे लागले.बबनराव तायवाडे, याचिकाकर्ते.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे