ठाकरे यांची नाराजी : काँग्रेस-बसपाची आयुक्तांशी चर्चा नागपूर : स्थायी समिती अध्यक्षांनी नगरसेवकांना विकास कामांसाठी पत्र दिले आहेत. मात्र, संबंधित कामे मंजूर करताना महापालिका प्रशासनाच्या स्तरावर भेदभाव केला जात आहे, अशी नाराजी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील काँग्रेस व बसपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे व्यक्त केली. शुक्रवारी ठाकरे यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी ठाकरे यांनी सागितले की, सहा महिन्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील समस्यांची दखल घेत विकास कामे सुचविली आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या कामांना देत पत्रही दिले आहेत. मात्र, काँग्रेस व बसपाच्या नगरसेवकांनी सादर केलेल्या विकास कामांच्या फाईल आयुक्त कार्यालयात अडवून ठेवण्यात आल्या आहेत. सत्ताधारी नगरसेवकांच्या फाईल्स मात्र मंजूर केल्या जात आहेत. या भेदभावाकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असतात. विकास कामांबाबत जनतेची भेदभाव करणे योग्य नाही. त्यामुळे येत्या काळात असे प्रकार होऊ नये व सर्व नगरसेवकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)सत्ताधाऱ्यांचा दबावकाँग्रेसला शंकामहापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे होऊ नये व त्यातून संबंधित नगरसेवकांच्या विरोधात जनतेते रोष निर्माण व्हावा, या उद्देशाने सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकून विकास कामांच्या फाईल्स रोखल्या आहेत, अशी काँग्रेसला शंका आहे. प्रशासनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून होत असलेली ही कोंडी फोडण्यासाठी संघर्ष करण्याचा व प्रशासनाचीच कोंडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
निधी वाटपात भेदभाव नको
By admin | Updated: June 11, 2016 03:19 IST