शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाधारे आदिवासींना बोगस ठरवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:49 IST

हलबा लोकांनी कोष्टी व्यवसाय केला म्हणून आणि हिंदू धर्माच्या नावावर त्यांना अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आदिम कृती समिती : आदिवासी आयुक्त कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्युज नेटवर्कनागपूर : हलबा लोकांनी कोष्टी व्यवसाय केला म्हणून आणि हिंदू धर्माच्या नावावर त्यांना अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहे. हा खºया आदिवासींवर अन्याय असून या विरोधात राष्ट्रीय आदिम कृती समितीने संविधान चौकातून अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून संताप व्यक्त केला.राष्ट्रीय आदिम कृती समितीने आमदार विकास कुंभारे, अ‍ॅड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हल्लाबोल मोर्चाची सुरुवात केली. आदिवासींना वैधता प्रमाणपत्र द्यावे, बोगस आदिवासींवर कारवाई करावी असे फलक घेऊन आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. ‘लेके रहेंगे, अपना हक लेके रहेंगे’, ‘गर्व से कहो हम आदिवासी है, भारत के मूल निवासी है’, हलबा एकता जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. मोर्चा संविधान चौकातून मॉरिस टी पॉईंट, व्हेरायटी चौक या मार्गाने काढण्यात आला. बोले पेट्रोल पंप येथे आदिमतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आदिवासी बांधवांनी रास्ता रोको केला.यावेळी १९७६ ते २००२ या कालावधीत अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश नसताना प्रधान, बुरड, गोंड यांना अनुसूचित जमातीचे बोगस वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. अशा बोगस पत्रांवर नोकरी करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करावी, राज्यातील जात तपासणी समित्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणात आणाव्या, राज्य शासनाच्या १५ वर्षाच्या अधिवास प्रमाणपत्रावर जाती प्रमाणपत्र निर्गमित करावे, १९५० पूर्वीची अट घालणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, कुटुंबात एका व्यक्तीला जात वैधता प्रमाणपत्र मिळाल्यास त्या आधारावर इतर सदस्यांना वैधता प्रमाणपत्र द्यावे, जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा २००१ चा कायदा रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन आदिवासी आयुक्त कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.यावेळी आमदार विकास कुंभारे, प्रकाश निमजे, अ‍ॅड नंदा पराते, विश्वनाथ आसई, दे. बा. नांदकर, धनंजय धापोडकर यांच्यासह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.