शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

करा तिरंग्याचा सन्मान, राखा शहिदांचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:01 IST

जगात दोन तऱ्हेचे लोक असतात. समाजात ज्या गोष्टी घडत आहेत, त्यांना निमूटपणे पाहत आयुष्य जगणारे आणि दुसरे म्हणजे समाजात स्वत:च्या कृतीने प्रबोधन करुन नवा आदर्श प्रस्थापित करणारे. नागपुरातील हितेश डोर्लीकर हा तरुण हा याच दुसऱ्या गटात मोडणारा आहे. मागील आठ वर्षांपासून सातत्याने तो राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याच्या सन्मानासाठी झटत आहे. स्वातंत्र्यदिवस व गणतंत्रदिवस या राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याच्या पुढाकारातून जमिनीवर पडलेले कागदी व प्लास्टिकचे झेंडे गोळा करणे व नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याची मोहीम त्याच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोघांपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आता २५ हून अधिक तरुण-तरुणी जुळले आहेत.

ठळक मुद्देहितेश डोर्लीकरची अनोखी साधना : रस्त्यावर पडलेले कागदी झेंडे उचलण्याची राबवतोय मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात दोन तऱ्हेचे लोक असतात. समाजात ज्या गोष्टी घडत आहेत, त्यांना निमूटपणे पाहत आयुष्य जगणारे आणि दुसरे म्हणजे समाजात स्वत:च्या कृतीने प्रबोधन करुन नवा आदर्श प्रस्थापित करणारे. नागपुरातील हितेश डोर्लीकर हा तरुण हा याच दुसऱ्या गटात मोडणारा आहे. मागील आठ वर्षांपासून सातत्याने तो राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याच्या सन्मानासाठी झटत आहे. स्वातंत्र्यदिवस व गणतंत्रदिवस या राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याच्या पुढाकारातून जमिनीवर पडलेले कागदी व प्लास्टिकचे झेंडे गोळा करणे व नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याची मोहीम त्याच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोघांपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आता २५ हून अधिक तरुण-तरुणी जुळले आहेत.स्वातंत्र्यदिन किंवा गणतंत्रदिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्यात येतात. मात्र स्वातंत्र्यदिनी जागोजागी तिरंग्याचा सार्वजनिकपणे अपमान होताना दिसतो. गाड्यांवर लावण्यासाठी, मोटारसायकल रॅलीवर मिरविण्यासाठी तिरंगे उत्साहाने घेतले जातात. मात्र अतिउत्साहात तिरंग्याचा अपमान होत असल्याची जाणदेखील राहत नाही. भरधाव वेगाने मोटारसायकल दामटत असताना तिरंगा कधी रस्त्यावर पडतो हे कळतदेखील नाही. विशेष म्हणजे रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला तरी त्याला उचलण्याची तसदी फारच कमी नागरिक घेतात.२०१० साली घराजवळच तिरंगा चुरगळल्या अवस्थेत पडलेला पाहून हितेशने मनाशी संकल्प केला आणि त्यानंतर त्याने स्वत: पासूनच एका नव्या मोहिमेची सुरुवात केली. स्वातंत्र्यदिवस व गणतंत्रदिवसानंतर चौकाचौकांमध्ये, रस्त्यांवर पडलेले, अनवधानाने फाटलेले किंवा चुरगळल्या गेलेले कागदी झेंडे गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. ‘कामयाब फाऊंडेशन’, ‘हर दिन होंगे कामयाब’ आणि ‘नाग स्वराज फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तरुण त्याच्याशी जुळत गेले. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील नागपूर शहरातील उद्याने, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लास्टिकचे ध्वज कार्यकर्ते गोळा करतील. सोबतच नागरिकांना तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आवाहन करीत जनप्रबोधनदेखील करण्यात येईल.तिरंग्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवारस्त्यावर जीर्ण झालेले, फाटलेले कागदी झेंडे पाहून मन विचलित होते. या अस्वस्थेतूनच मी ही मोहीम सुरू केली. ज्या तिरंग्याला घडविण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक, सैन्याचे जवान यांनी भर तरुणाईत स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले, त्याची आठवण नवीन पिढीने ठेवण्याची गरज आहे, अशी भावना हितेशने व्यक्त केली.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजIndependence Dayस्वातंत्र्य दिवस