शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी विद्यापीठे महाराष्ट्राकडून अधिक पैसा घेतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे परदेशी शिष्यवृत्ती ...

आनंद डेकाटे

नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करते. या शिष्यवृत्तीवर राज्य सरकार जितका निधी दरवर्षी खर्च करते त्याच्या तुलनेत केंद्र सरकारचा खर्च कमी आहे. परंतु परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या मात्र राज्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठे राज्य शासनाकडून अधिक पैसा घेतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना प्रदान केली जाते. दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मागील पाच वर्षाचा विचार केला तर राज्य सरकारने परदेशात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांवर दरवर्षी २२ ते ३५ कोटी रुपये खर्च केले आहे.

केंद्र सरकारतर्फेसुद्धा परदेशी शिक्षणासाठी आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. केंद्र सरकार दरवर्षी १०० विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी पाठवते. मागील पाच वर्षाचा विचार केला तर केंद्र सरकारने या १०० विद्यार्थ्यांवर साडेचार कोटी ते २८ कोटी रुपयापर्यंत दरवर्षी खर्च केले. त्यामुळे केंद्राला जे शक्य झाले ते राज्य सरकारला शक्य नाही का, असा प्रश्न आहे.

- केंद्र सरकार

वर्ष लाभार्थी विद्यार्थी खर्च

२०१६-१७ - १०८ - १४.०२ कोटी

२०१७-१८ - १८३ - ४.५९ कोटी

२०१८-१९ - १०० - ५.९७ कोटी

२०१९-२० - १०० - २८.५६ कोटी

२०२०-२१ - ७९ - १८.४८ कोटी

---------------------------------------

- राज्य सरकार

वर्ष लाभार्थी विद्यार्थी खर्च

२०१६-१७ - ७५ - २२.२५ कोटी

२०१७-१८ - ४७ - २६.०३ कोटी

२०१८-१९ - ७५ - ३२ कोटी

२०१९-२० - ७५ - ३५ कोटी

२०२०-२१ - ७५ - ३० कोटी

- परदेशी शिष्यवृत्तीबाबत राज्य सरकारचा भोंगळ कारभार आहे. केंद्र सरकारला जे शक्य झाले ते राज्य सरकारला का होत नाही. एकूणच कुठेतरी हा पैसा मुरतोय असे दिसून येतो. याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

अतुल खोब्रागडे,

खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीने संघटनेचे नेते