शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी विद्यापीठे महाराष्ट्राकडून अधिक पैसा घेतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:23 IST

Nagpur News परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या मात्र राज्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठे राज्य शासनाकडून अधिक पैसा घेतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेंद्राचा खर्च कमी लाभार्थी अधिकराज्याचा खर्च अधिक लाभार्थी कमी

आनंद डेकाटे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करते. या शिष्यवृत्तीवर राज्य सरकार जितका निधी दरवर्षी खर्च करते त्याच्या तुलनेत केंद्र सरकारचा खर्च कमी आहे. परंतु परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या मात्र राज्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठे राज्य शासनाकडून अधिक पैसा घेतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना प्रदान केली जाते. दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मागील पाच वर्षाचा विचार केला तर राज्य सरकारने परदेशात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांवर दरवर्षी २२ ते ३५ कोटी रुपये खर्च केले आहे.

केंद्र सरकारतर्फेसुद्धा परदेशी शिक्षणासाठी आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. केंद्र सरकार दरवर्षी १०० विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी पाठवते. मागील पाच वर्षाचा विचार केला तर केंद्र सरकारने या १०० विद्यार्थ्यांवर साडेचार कोटी ते २८ कोटी रुपयापर्यंत दरवर्षी खर्च केले. त्यामुळे केंद्राला जे शक्य झाले ते राज्य सरकारला शक्य नाही का, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र