शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएमएलटी’ पदविकाधारक पॅथालॉजी चालवू शकत नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:53 IST

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने जुलै-२०१८ मध्ये आदेश जारी करून डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तींना पॅथालॉजी लॅब चालवण्याची परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने जुलै-२०१८ मध्ये आदेश जारी करून डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तींना पॅथालॉजी लॅब चालवण्याची परवानगी दिली आहे.

नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून केंद्र सरकारची अधिसूचना व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती पॅथालॉजी लॅब चालवू शकत नाही असा दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सोमवारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने जुलै-२०१८ मध्ये आदेश जारी करून डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तींना पॅथालॉजी लॅब चालवण्याची परवानगी दिली आहे. हा आदेश केंद्र सरकारची अधिसूचना व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार साधी पॅथालॉजी लॅब चालवणारी व्यक्ती एमबीबीएस आणि मध्यम व उच्च तांत्रिक पॅथालॉजी लॅब चालवणारी व्यक्ती एमडी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असोसिएशनच्या वतीने ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. सहीचा अधिकारही एमबीबीएस, एमडीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एमबीबीएस व एमडी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तीशिवाय इतर कुणाला पॅथालॉजी अहवाल देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती  पॅथालॉजी लॅब चालवू शकत नाही हे घोषित करण्यात यावे व महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचा वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे  आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरHigh Courtउच्च न्यायालय