शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डीजेचा आवाज बंद !

By admin | Updated: September 25, 2015 03:35 IST

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठमोठे डीजे लावणारी मंडळे स्वत:वर ‘विघ्न’ ओढवून घेणार आहेत.

वाहनांवर कारवाई होणार : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार नागपूर : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठमोठे डीजे लावणारी मंडळे स्वत:वर ‘विघ्न’ ओढवून घेणार आहेत. वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून डीजे सेट बसवून ध्वनिप्रदूषणाबाबत मानदंडाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी वाहतूक पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) दिले आहेत.दिवसेंदिवस वाढत असलेले ध्वनिप्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम आता एक समस्या झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने डीजे सेटद्वारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कारवाईबाबत निर्णय दिला आहे. त्यानुसार वाहनांमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून डीजे सेट बसविणाऱ्या तसेच याद्वारे कर्णकर्कश्श संगीत वाजवून ध्वनिप्रदूषणबाबात मानदंडाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात यावी, असे आदेश परिवहन आयुक्तांनी एप्रिल २०१५ मध्ये दिले होते. दोषी वाहनमालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ५२ तसेच १९० (२) या प्रमाणे कारवाई करण्याची, तसेच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १३३ प्रमाणे संबंधित प्रकरण स्थानिक पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्याची, या शिवाय परवाना निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गणेशोत्सवानिमित्ताने घेतलेल्या नुकत्याच एका बैठकीत डीजे वाजविताना होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण असावे, यावर लक्ष वेधत वाहनांची तपासणी करून दोषी वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)