शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांचा मोर्चा विधानभवनावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:00 IST

पंतप्रधान आवास योजनेत नंबर लागलेल्या सर्व दिव्यांगांना मोफत घरकुल देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी नारेबाजी : अपंग आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर निघाला नाही तोडगा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंतप्रधान आवास योजनेत नंबर लागलेल्या सर्व दिव्यांगांना मोफत घरकुल देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान अपंग आयुक्तालयाने या मोर्चाची दखल घेतली. आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी मोर्चास्थळी भेट दिली. पाच सदस्यांचे शिष्टमंडळ अपंग आयुक्त कार्यालयात गेले. परंतु आयुक्तांनी दिलेल्या पत्रामुळे दिव्यांग बांधवांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी मोर्चा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे रात्री दिव्यांग बांधवांनी बॅरिकेट तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील दिव्यांगांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी जोरदार नारेबाजी केली. दरम्यान अपंग आयुक्त कार्यालयातील अपंग आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी मोर्चाला भेट दिली. यावेळी दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांसाठीचा राखीव निधी कुठे खर्च केला अशी विचारणा करून खर्च केला नसल्यास त्याची कारणे संबंधित विभागाला विचारण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी संबंधित विभागांना दिव्यांगांचा निधी त्वरित खर्च करण्याबाबत पत्र देण्याचे आश्वासन दिले. दिव्यांगांच्या शिष्टमंडळास त्यांनी चर्चेसाठी बोलावले. गिरीधर भजभुजे, डॉ. राजू राऊत, कल्पना पाटील, आशिष आमदरे, बालू मांडवकर, नरेंद्र सोनडवले, आरिफ शेख चर्चेसाठी अपंग आयुक्त कार्यालयात गेले. अपंग आयुक्तांनी दिव्यांगांसाठीचा निधी खर्च करण्याबाबतचे पत्र विविध विभागांना दिले. परंतु व्यवसाय स्टॉल आणि घरकुल योजनेसाठी दिव्यांग निधी खर्च करावा, असा उल्लेख पत्रात नसल्यामुळे दिव्यांग बांधवांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.नेतृत्व : गिरीधर भजभुजे, डॉ. राजू राऊत, कल्पना पाटील, आशिष आमदरे, बालू मांडवकर, नरेंद्र सोनडवले, आरिफ शेखमागण्या : प्रधानमंत्री आवास योजनेत नंबर लागलेल्या दिव्यांगांना मोफत घरकुल द्यावे२) समाजकल्याण खात्यातून अपंग विभाग वेगळा करून त्याचे बजेट २०० कोटी करावे३) समाजकल्याण खात्यातील बीज भांडवल योजनेची कर्ज मर्यादा ५ लाख करून ५० वर्षाची अट रद्द करावी४) दिव्यांगांच्या मुलामुलींना मोफत शालेय, उच्च शिक्षण व शिष्यवृत्ती द्यावी५) दोन दिव्यांगांच्या विवाहाला १ लाख अर्थसाहाय्य द्यावे६) दिव्यांगांना २०० चौरस फूट जागा देण्याच्या जी. आर. ची त्वरित अंमलबजावणी करावी

टॅग्स :Morchaमोर्चाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन