शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

नागपुरात होणार दिव्यांग प्रादेशिक केंद्र

By admin | Updated: January 12, 2017 19:38 IST

शहरात दिव्यांगांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्र्राच्या उभारणीसाठी मौजा जाटतरोडी येथील २२३२० चौ. मीटर जमीन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 12 -  शहरात दिव्यांगांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्र्राच्या उभारणीसाठी मौजा जाटतरोडी येथील २२३२०  चौ. मीटर जमीन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट आॅफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटिज’ या संस्थेला देण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने मान्यता दिली आहे.केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिव्यांगासाठी प्रादेशिक केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिव्यांगांचे मोठे शिबिर नागपुरात झाले त्यावेळी दिव्यांगांना दिले होते. त्यानुसार पालकमंत्री बावनकुळे यांनी दिव्यांगांच्या या केंद्रासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेतली व या संदर्भातील निर्णय शासनाने १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.राज्य शासनाने नुकतेच ४ जानेवारी रोजी शासन मान्यतेचे परिपत्रक जारी केले आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्युट फॉर एम्पॉवरमेंट आॅफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटिज’ या संस्थेने नागपूर येथे दिव्यांगांसाठी संयुक्त प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यास ५ एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची विनंती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना केली होती.राज्य शासनाने या जागेला मान्यता देताना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून जागेचे नूतनीकरण आणि भाडेपटट्याची तरतूद केली आहे. वार्षिक १ रुपया नाममात्र दराने ही जमीन ३० वर्षाच्या लीजवर देण्यात आली आहे. जमिनीचा वापर केवळ मंजूर असलेल्या प्रयोजनासाठीच करता येणार आहे. या प्रादेशिक केंद्र्रामुळे दिव्यांग व्यक्तींची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीविचारात घेऊन त्यांचे पुनर्वसन, त्यांचे विशेष शिक्षण व प्रशिक्षण आदींच्या माध्यमातून रचनात्मक मनुष्यबळ विकास साधने, दिव्यांग व्यक्तीबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, राज्यातील दिव्यांग व्यक्तींचा विकास साधण्यास या केंद्रामुळे मदत होणार आहे.