शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटीत पत्नीलाच लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: काकावर फरशीने हल्ला नागपूर : भांडण करण्यास मनाई करणाऱ्या काकालाच एका युवकाने फरशीने जखमी केले. भोसले नगर, जुना ...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

काकावर फरशीने हल्ला

नागपूर : भांडण करण्यास मनाई करणाऱ्या काकालाच एका युवकाने फरशीने जखमी केले. भोसले नगर, जुना सक्करदरा येथील सोनू श्यामराव कोहळे हा मंगळवारी रात्री विनाकारण शिवीगाळ करून भांडण करत होता. हे पाहून त्यांच्या किरायेदाराने सोनूचे काका प्रवीण कोहळे यांनी भांडण न करण्याबद्दल समजाविण्यास सांगितले. ते सोनूला समजावत असतानाच संतापाच्या भरात त्याने काकाच्या डोक्यावर फरशीचे वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

जरीपटका-यशोधरा नगरातील अवैध व्यवसायांवर कारवाई

नागपूर : झोन पाचमधील जरीपटका आणि यशोधरा नगरातील अवैध व्यवसायावर छापा घालून पोलिसांनी चौघांना पकडले आहे. झोन क्रमांक पाचचे डीसीपी नीलोत्पल यांच्या पथकाला इंदोरा येथील भंडारा मोहल्यात अमोल नरेश वासनिक (३८) याच्या पुढाकारात मटका चालविला जात असल्याचे कळले. यावरून एपीआय विजय भिसे, शिपाई सूरज भारती, दिनेश यादव, हरीश इंगळे, चेतन जाधव, रवींद्र राऊत यांनी सापळा रचून अमोलला रंगेहात पकडले. मोबाईसह ६,५०० रुपयांचा माल जप्त केला. गणेशलाल श्यामसुंदर साहू (६०) या बेझनबाग येथील व्यक्तीला दुचाकीवरून दारूची तस्करी करताना पकडले. ७ हजाराच्या दारूसह दुचाकी जप्त करण्यात आली. यशोधरा नगर ठाण्याचे पीएसआय जितेंद्र भार्गव यांनी यादव नगरातील जितेंद्र आनंद चवरे (३०) याच्या घरी धाड घालून दारू जप्त केली. सिद्धार्थनगरातील नकुल राजू पांडे (२२) हा संशयास्पद स्थितीत दिसला असता. त्याचा पाठलाग केला असता त्याच्याजवळ चाकू आढळून आला. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.