शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवजात गोंडस मुलीमुळे घटस्फोट घेतलेले दांपत्य पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 08:00 IST

Nagpur News एक दाम्पत्य भांडण विकोपाला गेल्यानंतर सहमतीने घटस्फोट घेऊन विभक्त झाले होते. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलीला जन्म देताच या दाम्पत्यामधील ताणलेले संबंध हळूहळू सैल होत गेले आणि त्यांनी जुने सर्व वाद विसरून पुनर्विवाह केला.

ठळक मुद्देजुने सर्व वाद विसरले संसाराची घडी नीट केली

राकेश घानोडेनागपूर : आयुष्य केव्हा कोणते वळण घेईल, हे कुणीही सांगू शकत नाही. एक दाम्पत्य भांडण विकोपाला गेल्यानंतर सहमतीने घटस्फोट घेऊन विभक्त झाले होते. त्यावेळी पत्नी गर्भवती होती. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलीला जन्म देताच या दाम्पत्यामधील ताणलेले संबंध हळूहळू सैल होत गेले आणि त्यांनी जुने सर्व वाद विसरून पुनर्विवाह केला. (Divorced couples reunite because of a newborn cute girl)प्रकरणातील पती-पत्नी अभियंते असून, ते दोघेही तोडीस तोड असल्यामुळे त्यांच्यामध्ये विविध कारणांवरून वाद व्हायचे. पतीने वारंवार पार्ट्या करणे, मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे, दारू पिणे इत्यादी गोष्टी पत्नीला आवडत नव्हत्या, तर पत्नीचे सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे, माहेरी तासनतास फोनवर बोलणे, घराच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे इत्यादी गोष्टी पतीला पटत नव्हत्या. कुटुंबात दोघेच असल्यामुळे त्यांना समजावण्यासाठी तिसरे कोणीच राहत नसे.  परिणामी, दोघेही माघार घेत नव्हते.

त्यातून त्यांचे भावनिक बंध हळूहळू तुटायला सुरुवात झाली. लग्नानंतर आनंदात सुरू झालेला संसार दोन वर्षांतच विस्कटला. प्रेमाची जागा अहंकाराने घेतली. शेवटी एकमेकांसोबत पटतच नाही तर, एकत्र राहायचे कशाकरिता, असा प्रश्न त्यांना सतवायला लागला आणि त्यांनी सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पत्नी गर्भवती होती; पण डोळ्यांवर मी पणाची पट्टी असल्यामुळे दोघांपैकी कुणीही याचा विचार केला नाही. ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले; परंतु मुलीच्या जन्माने त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा ओलावा पुन्हा जिवंत केला. ती मुलगी त्यांच्यामधील प्रेमाचा पुरावा होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र येऊन विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा बसविली अन् नवीन प्रवासाला सुरुवात केली.प्रेमाची जाणीव गरजेचीपती-पत्नीमध्ये वाद होण्यात काहीच नवीन नाही; परंतु वाद वाढत असल्यास त्यांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे असते. या प्रकरणात विभक्त दाम्पत्याच्या गोंडस मुलीने हेच केले. समीर सोनवणे, पत्नीचे वकील

 

टॅग्स :Courtन्यायालय