शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘कोटीं’चा घटस्फोट

By admin | Updated: July 18, 2015 02:40 IST

एका बड्या व्यावसायिकाने पत्नीला १ कोटी ५० लाखांची एकमुस्त खावटी आणि मुलीचा निर्वाह, शिक्षण आणि लग्नाचा खर्च म्हणून १ कोटी ३५ लाख रुपये असे एकूण २ कोटी ८५ लाख रुपये दिले.

राहुल अवसरे  नागपूर एका बड्या व्यावसायिकाने पत्नीला १ कोटी ५० लाखांची एकमुस्त खावटी आणि मुलीचा निर्वाह, शिक्षण आणि लग्नाचा खर्च म्हणून १ कोटी ३५ लाख रुपये असे एकूण २ कोटी ८५ लाख रुपये दिले. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या इतिहासातील हा सर्वाधिक महागडा घटस्फोटाचा दावा प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांच्या न्यायालयाने निकाली काढला. या व्यावसायिकाची घटस्फोटाची याचिका मंजूर करीत पती-पत्नीच्या परस्पर सामंजस्यातून त्यांचे वैवाहिक संबंध विच्छेदित झाल्याचे न्यायालयाने आपला निकाल देताना जाहीर केले. घटस्फोट झालेले दाम्पत्य नागपुरातील गर्भश्रीमंत, प्रतिष्ठित व व्यावसायिक कुटुंबातील आहे. पती ४४ आणि पत्नी ४३ वर्षांची आहे. प्रकरण असे की, या दोघांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी २५ जानेवारी १९९० रोजी मोठ्या थाटात नागपुरातच पार पडला होता. २५ फेब्रुवारी २०१२ पर्यंत तब्बल २२ वर्षे त्यांचा संसार सुरळीत होता. त्यांना २४ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा आहे. अचानक पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते वेगवेगळे राहू लागले. भविष्यात एकत्र राहण्याची आशा नसल्याने त्यांनी परस्पर सामंजस्यातून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीने २२ मार्च २०१३ रोजी घटस्फोटासाठी हिंदू विवाह कायद्यांतर्गत कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नीनेही आपला दावा दाखल केला होता. दोघांनीही आपल्या संसारात पूर्ववत परतावे म्हणून याचिका प्रलंबन काळात विवाह समोपदेशाकडून त्यांच्यात मन परिवर्तनाचा प्रयत्न करण्यात आला. तथापि समझोता घडून आला नाही. त्यामुळे दोघेही परस्पर सामंजस्यातून घटस्फोट देण्यास तयार झाले. त्यांनी अटींसह आपापली संमती न्यायालयात सादर केली. दोन्ही पक्षांनी आपापले शपथपत्रही न्यायालयात दाखल केले. पती-पत्नी आणि त्यांच्या वकिलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. दोघेही परस्परांपासून घटस्फोट मागत असल्याने, त्यांच्यात एकोपा होण्याची शक्यता नसल्याने, दोघेही परस्परांविरुद्ध याचिका दाखल न करण्यास मान्य झाल्याने तसेच त्यांच्यात स्त्रीधनाबाबत कोणताही वाद नसल्याने न्यायालयाने २५ जानेवारी १९९० रोजी त्यांचा झालेला विवाह संपुष्टात आल्याचे जाहीर केले. याचिकाकर्त्या व्यावसायिकाने ताबडतोब पत्नीच्या एकमुस्त खावटीचा तसेच मुलीच्या निर्वाह, शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या रकमेचे ‘पे आॅर्डर’ न्यायालयात दिले. नागपुरातील या सर्वाधिक महागड्या घटस्फोट दाव्याची चर्चा वकिलांमध्ये केली जात आहे.