शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय व्हावे

By admin | Updated: November 24, 2014 01:16 IST

नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, न्यायालयातील गर्दी व खेड्यापाड्यातील पक्षकारांना पडणारा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरऐवजी कळमेश्वर, सावनेर, काटोल

न्या. भूषण गवई : कळमेश्वर येथे नवीन इमारतीचा कोनशिला समारंभकळमेश्वर : नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, न्यायालयातील गर्दी व खेड्यापाड्यातील पक्षकारांना पडणारा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरऐवजी कळमेश्वर, सावनेर, काटोल व नरखेड या चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय स्थापन व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कळमेश्वर येथील दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती किशोर सोनवणे, आ. सुनील केदार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत ताजने, प्रबंधक राजेंद्रकर, कळमेश्वरचे न्यायाधीश विकास कारमोरे, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, न्या. बेदरकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे कुमकुम तिलक करून स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागतगीत सादर केले.अ‍ॅड. सागर कऊटकर यांनी प्रास्ताविकात कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड हे तालुके मिळून कळमेश्वर येथे विभागीय जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी केली. याप्रसंगी न्या. किशोर सोनवणे यांनी आपल्या भाषणात नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ होत असल्याने नागरिकांची गैरसोय संपणार आहे. या नवीन इमारतीसाठी तीन कोटी २१ लाख रुपये निधीतून नियोजित इमारत सहा महिन्यात बांधकाम विभाग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुनील केदार, अ‍ॅड. ताजने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हा सत्र न्यायमूर्तीसह कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, हिंगणा, उमरेड, रामटेक, कामठी न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपविभागीय पोलीस अधिकारी मोरेश्वर आत्राम, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, तहसीलदार, मुख्याधिकारी, विविध विभागातील अधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विधी कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. युवराज बागडे यांनी तर उपस्थितांचे आभार न्या. विकास कारमोरे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)