शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्षा सावरकर अडचणीत !

By admin | Updated: September 22, 2016 02:52 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाने जि.प. अध्यक्ष व त्यांच्या पतींना संपत्तीचे खोटे विवरण सादर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस : निवडणूक शपथपत्रात संपत्ती लपविल्याचा प्रकार नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाने जि.प. अध्यक्ष व त्यांच्या पतींना संपत्तीचे खोटे विवरण सादर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर सात दिवसात उत्तर मागितले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयात झालेल्या सुनावणीत हा खुलासा झाल्याची माहिती माहिती जि.प.चे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका २०१२ साली झाल्या होत्या. या निवडणुकीत निशा सावरकर यांनी धानला सर्कल व त्यांचे पती टेकचंद सावरकर यांनी खात रेवरार सर्कलमधून निवडणूक लढविली होती. त्यांनी नामनिर्देशन पत्रात संपत्तीचे खोटे विवरण सादर केले होते. पती-पत्नी शपथपत्रात तफावत आढळली होती. यासंदर्भात पराभूत उमेदवार योगिता हटवार यांनी निशा सावरकर यांनी खोटे शपथपत्र सादर केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने २९ डिसेंबर २०१२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्याने मौदा तहसिलदाराला चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तहसिलदाराने ४ फेब्रुवारी २०१३ ला चौकशी अहवाल सादर केला होता. तहसिलदाराच्या अहवालाद्वारे संपत्तीचे खोटे विवरण दिल्याचे सिद्ध झाले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी कारवाई न करता ११ आॅगस्ट २०१४ ला आयोगाला मार्गदर्शनासाठी पत्र पाठविले. त्यावर आयोगाने १५ सप्टेंबर २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्या पातळीवर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. त्यानंतरही कारवाई झाली नाही. कारवाईत होत असलेली टाळाटाळ लक्षात घेता, माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांनी माहितीच्या अधिकारात या प्रकरणी काय कारवाई झाली, अशी विचारणा केली होती. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अध्यक्षांना मालमत्ता लपविल्याबद्दल आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, असे कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कारवाईला विलंब का?आयोगाने कारवाईचे आदेश दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते. या प्रकरणात कार्यकाळ संपत असताना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोगाच्या स्पष्ट सूचना असतानाही कारवाईस चार वर्षाचा कालावधी होतोच कसा असा सवाल तापेश्वर वैद्य यांनी केला आहे.