शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जिल्हाध्यक्षांची घोषणा मुंबईत

By admin | Updated: July 9, 2015 02:56 IST

भंडारा, गोंदिया व बुलडाणा वगळता विदर्भातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी बुधवारी पक्षाच्या इच्छुकांच्या रविभवन येथे चर्चा केली.

नागपूर : भंडारा, गोंदिया व बुलडाणा वगळता विदर्भातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी बुधवारी पक्षाच्या इच्छुकांच्या रविभवन येथे चर्चा केली. याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर करण्यात येईल. त्यानंतर नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्र्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली.पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची पटणा येथील अधिवेशनात बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री सुनील तटकरे यांची फेररनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जिल्हाध्यक्षांची निवड झालेली नाही. यासाठी विदर्भातील इच्छुकांशी चर्चा करण्यात आली.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशुमख, मनोहर नाईक, रमेश बंग, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, धर्मरावबाबा आत्राम, राजेंद्र जैन, वसुधा देशमुख यांच्यासह विदर्भातील पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.पक्षात नेतृत्वाची संधी मिळावी अशी कार्यक र्त्यांची इच्छा असते. त्यामुळे सर्वसंमतीने निर्णय घेताना अडचणी येतात. मागील काही वर्षात नवीन पिढी राजकारणात पुढे आली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर नेतृत्वपरिवर्तन आवश्यक आहे. सर्वसंमतीने निर्णय झाला तर ८-१० दिवसात अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली.भाजपचा छुपा अजेंडाजिल्हा बँका कर्ज देत नाही. राष्ट्रीयीकृत बँका टाळटाळ करीत आहे.गेल्या वर्षी राज्य सहकारी बँकेच्या ठेवी १७ हजार कोटीच्या होत्या त्या ८ हजार ९०० कोटीवर आल्या आहेत. र्बंकेवरील प्रशासकाची तडकाफडकी उलबांगडी करण्यात आली. आपल्या सोयीची माणसे बसवण्याचा छुपा अजेंडा भाजप राबवित असल्याचा आरोप पवार यांनी केला. विदर्भातील नागपूर शहर व ग्रामीण वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, वाशीम व अमरावती आदी जिल्ह्यातील पक्षाचे शहर व जिल्हा प्रमुख, पदाधिकारी व प्रमुख कार्यक र्त्यांनी रविभवन येथे गर्दी केली होती. चंद्रपूर वगळता सर्वच जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी गटबाजी असल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षपदासाठी संदीप गड्डमवार तर शहर अध्यक्ष म्हणून शशिकांत देशकर यांच्या नावावर एकमत होते. राजेंद्र जैन, दीपक जैस्वाल, अभिषेक मानकर, मोरेश्वर टेंभुर्णे, महेंद्र लोखंडे आदींचा समावेश होता.अकोल्यातही चांगलीच रस्सीखेच दिसून आली. विद्ममान शहर अध्यक्ष अजय तापडिया, ग्रामीणचे श्रीकांत पिसे -पाटील, संतोष पुरके, तुकाराम बिडक, श्याम अवस्थी, विश्वनाथ कांबळे, सुरेंद्र्र शर्मा आदींचा समावेश होता.नागपुरात आरोप-प्रत्यारोपनागपूर शहर राष्ट्रवादीतील गटबाजी यावेळी निदर्शनास आली. विद्यमान शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी पक्ष बांधणीची माहिती दिली. रमण ठवकर यांनी त्यांची बाजू घेतली. त्याचवेळी शब्बीर विद्रोही यांनी सदस्य नोंदणीसाठी पुस्तके न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. ईश्वर बाळबुधे यांनी नेत्याकडून धमक्या मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वेदप्रकाश आर्य यांनी गतकाळात पक्ष मजबूत होता. १२ नगरसेवक निवडून आले होते. आज ती परिस्थिती नसल्याचे निदर्शनास आणले. प्रवीण कुंटे, महेंद्र्र भांगे यांनीही विचार मांडले. यातून पक्षातील मतभेद पुढे आले. ग्रामीण मधून माजी आमदार सुनील शिंदे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्र्रशेखर चिखले, सतीश शिंदे, विद्यमान अध्यक्ष बंडू उमरकर , राजाभाऊ टाकसाळे, दीप्तीताई काळमेघ यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग गटातील नेत्यांनी एकमेकावर आरोप के ल्याने गरमागरमी झाली. परंतु पवारांनी सर्वांना शांत केले.अमरावतीत मतभेदअमरावती शहर अध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या विरोधातील गटाने त्यांना बदलण्याची मागणी केली. असाच प्रकार ग्रामीणचे अध्यक्ष नितीन हिवसे यांच्याबाबतीत घडला. प्रा.शरद तसरे, अरुण गावंडे, अनिल ठाकरे, बाळासाहेब वऱ्हाडे , प्रकाश बोंडे, माजी आमदार राजकुमार पटेल, भरत तसरे आदी उपस्थित होते. अध्यक्षांची निवड मुंबईत केली जाणार आहे.