शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तीन इस्पितळांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

By admin | Updated: March 18, 2017 02:52 IST

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना : लाभार्थ्यांकडून घेतले अतिरिक्त शुल्क नागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी धंतोली येथील ‘क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल’, मेडिट्रीना हॉस्पिटल व ‘शतायु हॉस्पिटलवर कारवाई केली, तर रुग्णांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन केशव हॉस्पिटलची मान्यता काढून घेतली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या जिल्हा नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत योजनेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या आॅनलाईन तक्रारीची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले, अमरावती येथील अब्दुल रहीम रहेमान यांच्यावर धंतोली येथील ‘क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल’मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमधून हृदयशस्त्रक्रिया झाली. संबंधित हॉस्पिटलने पॅकेज व्यतिरिक्त ५९ हजार ५०० रुपये अतिरिक्त शुल्क घेतल्याची तक्रार त्यांनी केली. या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयाला अतिरिक्त घेतलेले शुल्क परत देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच धंतोली येथील शतायु हॉस्पिटलमध्ये तुषार सरोदे यांचेकडून ‘किडनी स्टोन’च्या शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या पॅकेज व्यतिरिक्त ४० हजार रुपये घेतले. या संदर्भात त्यांनी आॅनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अतिरिक्त शुल्क परत करण्यात आले आहे. या योजनेसंदर्भात नऊ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी तीन तक्रारींचे निवारण करुन संबंधितांना दिलासा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के राव, जिल्हा शल्यचिकित्सक यु.बी. नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, वार्डेकर, राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटीचे विभागीय सदस्य फनेंद्र चंदा, डॉ. लोहित लांजेवार, डॉ. पुरुषोत्तम चौधरी, नीलेश बागडे, डॉ. स्वप्नील दडमल आदी उपस्थित होते.