शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:15 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.

ठळक मुद्देकळमना येथील स्ट्राँंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्यानंतर सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात पोलीस उपायुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त निर्मला देवी, पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त विवेक मसाळे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभानिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संबंधित भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी सतत समन्वय ठेवावे. मतदान केंद्र परिसरात ध्वनिक्षेपकांवर बंदी असावी, दिव्यांगांना मतदान केंद्र परिसरात जाण्यासाठी सहकार्य करण्यात यावे, मतदारांना रांगेत मतदान करण्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे. दिलेल्या वेळेत मतदान झाल्यानंतर संबंधित मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन जीपीएस वाहनाने कळमना येथे नेण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी विशेष खबरदारी घेऊन काम करावे. कळमना येथील स्ट्राँंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्यानंतर त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत लक्ष ठेवावे, यासह मतदान प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019