शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना ‘जलयुक्त शिवार’चा पुरस्कार

By admin | Updated: April 16, 2017 01:34 IST

जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नागपूरचे जिल्हाधिकरी सचिन कुर्वे यांना २०१५-१६ या वर्षासाठी विभागीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नागपूर : जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नागपूरचे जिल्हाधिकरी सचिन कुर्वे यांना २०१५-१६ या वर्षासाठी विभागीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे.जलयुक्त शिवार हे राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. संपूर्ण राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी या अभियानाला अतिशय महत्त्व दिले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड हे तालुके डार्क झोनमध्ये आले होते. संत्रा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. अशा वेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढाकार घेऊन जलयुक्त शिवारअंतर्गत संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले. जलयुक्त शिवारच्या कामामुळे या दोन तालुक्यातील खाली गेलेली भूजल पातळी वर आली. यासोबतच हिंगणा आणि रामटेकमध्ये सुद्धा अतिशय चांगले काम करण्यात आले. याचे सर्व श्रेय हे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाते. त्यामुळेच जलयुक्त शिवारअंतर्गत नागपूर विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)