शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात जिल्हा बँकेचे कर्मचारी बेमुदत संपावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:27 IST

वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्त्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी देवेंद्र वानखेडे वगळता ७२ शाखा आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी मंगळवार, ५ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर प्राधिकृत मंडळाच्या धोरणाविरोधात नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देवार्षिक पगारवाढ व महागाई भत्त्याची मागणी : बँकिंग व्यवहार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्त्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी देवेंद्र वानखेडे वगळता ७२ शाखा आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी मंगळवार, ५ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर प्राधिकृत मंडळाच्या धोरणाविरोधात नारे-निदर्शने केली. मागण्यांवर चर्चा न झाल्यामुळे संप बुधवारीही सुरू राहील.संपामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे ग्राहक बँकिंग सेवेपासून वंचित राहिले. बँकेचे चार लाखांपेक्षा जास्त ग्राहक असून, त्यात ५० ते ६० हजार शेतकरी ग्राहक आहेत. संप पुढे काही दिवस सुरू राहिल्यास बँक पूर्णत: अडचणीत येणार आहे. मार्च महिना असल्याने बँकेच्या ठेवी आणि शेतकर्ज वसुलीवर मोठा परिणाम होणार आहे. विभागीय सहकारी संस्थेचे सहनिबंधक व बँकेच्या प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वानखेडे, सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक व मंडळाचे सदस्य अजय कडू, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ अनिल पाटील आणि बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजल कोरडे यांनी कर्मचाऱ्यांसोबत मागण्यांवर कुठलीही चर्चा न केल्यामुळे, संप आणखी तीव्र होणार आहे.बँकेच्या ७२ शाखांचे व्यवस्थापक आणि रोखपाल यांनी शनिवारी शाखा आणि तिजोरीच्या चाव्या प्रशासकीय अधिकारी देवेंद्र वानखेडे यांच्याकडे सोपविल्या आहेत. शहाणे म्हणाले, कर्मचाऱ्यांची एप्रिल २०१४ पासून नियमित सुरू असलेली वार्षिक पगारवाढ आणि मे २०१५ पासून महागाई भत्ता रोखण्यात आला आहे. प्राधिकृत मंडळाच्या अध्यक्षपदी सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा रखडला आहे. तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांनीही कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता रोखता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. वरिष्ठांच्या निर्देशानंतर आणि बँक नफ्यात असतानाही व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.संपादरम्यान युनियनचे सचिव चंद्रकांत रोठे, कोषाध्यक्ष अनुपकुमार पाटील, मिलिंद घोरमाडे, किशोर आसटकर, जयंत आदमने, राजेंद्र वानखेडे आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकStrikeसंप